आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुखःद:'कुमकुम भाग्य' मालिकेतील इंदू दादीची भूमिका साकारणा-या जरीना खान यांचे निधन, कार्डिअॅक अरेस्टमुळे मालवली प्राणज्योत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जरीना खान यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक स्टंट वुमन म्हणून केली होती.

छोट्या पडद्यावरील ‘कुमकुम भाग्य’या मालिकेत इंदू दादीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जरीना खान यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे वयाच्या 54 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक स्टंट वुमन म्हणून केली होती.

अभिनेता शब्बीर अहलुवालिया याने देखील जरीना यांच्यासोबतचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ‘वो चांदसा रोशन चेहरा’ असे म्हटले आहे.

टीव्ही अभिनेत्री श्रुती झाने जरीना यांच्यासोबत फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जरीना यांनी कुमकुम भाग्यशिवाय ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत देखील काम केले आहे. पण कुमकुम भाग्य मालिकेतील इंदू दादीच्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...