आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील ‘कुंडली भाग्य’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेने अनेकांची मने जिंकली होती. मालिकेतील धीरज धूपार (करण), श्रद्धा आर्या (प्रीता), मनित जौरा (रिषभ), अभिषेक कपूर (समीर) आणि अंजुम फकिह (सृष्टी) या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. लॉकडाऊनमुळे मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता सरकाराने दिलेल्या परवानगीनंतर पुन्हा चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळात अभिनेता धीरज धूपारने मात्र त्याच्या आवडत्या गोष्टी केल्या होत्या.
'कुंडली भाग्य' या मालिकेच्या चित्रीकरणास सुरूवात करण्याआधी धीरजने अनेक चविष्ठ भारतीय पदार्थ तयार करून बायकोला खायला घातले होते. जर तो अभिनेता बनला नसता तर त्याने आपल्या रेस्तराँची साखळी खासकरून प्रसिद्ध परांठेवाली गलीमध्ये उभारली असती, असे तो म्हणाला.
आपल्या या सीक्रेट पॅशनबद्दल धीरज बोलताना म्हणाला, “लॉकडाऊनदरम्यान मी माझ्या बायकोचे खूप लाड केले. मला पराठे खूप छान बनवता येऊ लागले होते. त्यामुळे मी तिच्या वाढदिवशी कोबीचे पराठे बनवले होते. त्याआधी मी बटाट्याचे पराठेही बनवले होते. जर मी अभिनेता झालो नसतो तर कुकिंगमध्ये करिअर केले असते. हॉटेल उघडायला मला आवडले असते.”
View this post on InstagramA post shared by Dheeraj Dhoopar (@dheerajdhoopar) on Jun 27, 2020 at 9:37pm PDT
सगळेच कलाकार सेटवर परतल्यावर भावुक झाले होते. धीरजही सेटवर परतताना अतिशय उत्सुक होता. आधी चित्रीकरणामध्ये रूजू होण्याबद्दल थोडा साशंक असलेला धीरज आता मात्र एनर्जीचा पॉवरहाऊस बनून परत आला असून सगळी काळजी व्यवस्थित घेत आहे आणि आपल्या आजूबाजूच्यांनाही घ्यायला लावत आहे. तो म्हणाला, “एवढ्या कठीण परिस्थितीत चित्रीकरण करणे तसे थोडे भीतीदायकच आहे पण तरीही एवढ्या दीर्घ काळानंतर सेटवर परत येताना आणि माझ्या या परिवाराला भेटताना मला अतिशय छान वाटतंय. सुरक्षितता म्हणून मला जमेल ते सगळं काही मी करतोय. सोशल डिस्टन्सिंग राखणे, नियमितपणे सॅनिटायझिंग करणे आणि इतरांनाही आठवण करून देणे. मी आशा करतो की हे जग लवकरच ठीक होईल, तोपर्यंत आपण सर्वांनीच नवीन नॉर्मलचा स्वीकार करून सुरक्षित राहावे', असे धीरज म्हणाला.
'कुंडली भाग्य' या मालिकेचे पुन्हा चित्रीकरण सुरु झाले आहे. आता लॉकडाऊननंतर मालिकेमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.