आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Fame Aman Verma's Mother Passes Away, Actor Shares Heartbreaking Note On Social Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:'क्योंकी सास भी कभी बहु थी' फेम अभिनेता अमन वर्माच्या आईचे वयाच्या79 व्या वर्षी निधन, सोशल मीडियावर शेअर केली इमोशनल नोट

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमनने आपल्या आईच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर एक भावनिक नोट लिहिली आहे.

छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहु थी' फेम अभिनेता अमन वर्माच्या आईचे निधन झाले आहे. 18 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 79 वर्षांच्या होत्या. मात्र, त्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही. अलीकडेच अमनने आपल्या आईच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर एक भावनिक नोट लिहिली आहे.

अमन वर्माने सोशल मीडिया अकाउंटवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, ‘मला सर्वांना सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझी आई कैलास वर्मा यांचे निधन झाले आहे,’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रार्थना सभेचे आयोजन केलेले नाही. माझ्या आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा, असेही अमन म्हणाला आहे.

टीव्ही कलाकारांनी वाहिली अमनच्या आईला श्रद्धांजली
अमनच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. अमनचा मित्र विंदू दारा सिंह, डेलनाज इराणी, जसवीर कौर, शिवानी गोसाई, श्वेता गुलाटी आणि इतर काही कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

1987 मध्ये झाली होती अमनच्या करिअरची सुरुवात

अमन वर्मा सध्या छोट्या पडद्यापासून दूर असून वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये बिझी आहे. 'इंडियन आयडॉल', 'शांती', 'सीआयडी', 'औरत', 'क्योंकी सास भी कभी बहु थी', 'कुमकुम' यासारख्या अनेक सुपरहिट कार्यक्रमांमध्ये झळकला आहे. त्याने 1987 मध्ये ‘पचपन खंभे लाल दीवारे’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2003 मध्ये अमन 'प्राण जाए पर शान न जाए' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. यानंतर अमनने 'अंदाज', 'बागवान', 'वाह लाइफ हो तो ऐसी' आणि 'बाबुल' अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले.

बातम्या आणखी आहेत...