आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत कुटुंब:5 वर्षांपूर्वी आत्महत्या करणा-या प्रत्युषा बॅनर्जीचे आईवडील आर्थिक संकटात, म्हणाले - केस लढता लढता आमचे सगळे काही संपले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्युषाने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. प्रत्युषाने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचे आई-वडील न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही.ही न्यायालयीन लढाई लढता लढता आम्ही सर्व काही गमावले आहे, असे तिच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

प्रत्युषा ही शंकर बॅनर्जी आणि सोमा बॅनर्जी यांची एकुलती एक मुलगी होती. अलीकडेच एका मुलखतीत शंकर बॅनर्जी यांनी सांगितले,'ज्या दिवशी आमची मुलगी गेली त्याच दिवशी आमचे सगळे काही संपले. या घटनेनंतर असे वाटते की एखादे वादळ आले आणि आमचे सगळे आयुष्य त्याने उद्ध्वस्त करून टाकले. केस लढता लढता आमचे सगळे काही संपले. आमच्याकडे एक रुपयाही राहिला नाही. आता आमच्यावर कर्ज घेण्याचीही वेळ आली आहे.'

ते पुढे म्हणाले, ' प्रत्युषाशिवाय आमचे कोणीच नाही. तिनेच आम्हाला मोठ्या उंचीवर पोहोचवले होते तिच्या पश्चात आम्ही कसेबसे आयुष्य जगत आहोत. कोर्ट कचेरीसाठी आम्ही राहते घर विकले आणि आम्ही दोघेजण आता एका खोलीत रहात आहोत. आयुष्य कसेबसे जगत आहोत.' मी माझ्या मुलीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. एक ना एक दिवस आम्हाला न्याय नक्की मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे

त्यांनी सांगितल्यानुसार, प्रत्युषाची आई चाईल्ड केअर सेंटरमध्ये काम करते. तर ते स्वतः लिखाण करतात. त्यातून काही पैसे जमवले जातात.

2016 मध्ये झाला होता प्रत्युषाचा मृत्यू

प्रत्युषाने 1 एप्रिल 2016 रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रत्युषा केवळ 24 वर्षांची होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत तिने आत्महत्या केल्याची नोंद केली. परंतु प्रत्युषाने आत्महत्या नाही तर तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या आई वडिलांनी म्हटले होते. तशी त्यांनी कोर्टात केसही दाखल केली असून ती केस अजूनही कोर्टात सुरू आहे.

प्रत्युषाचा जन्म 10 ऑगस्ट 1991 रोजी जमशेदपूर येथे एका मिडल क्लास कुटुंबात झाला होता. तिने जमशेदपूर येथील केरल पब्लिक स्कूल कदमा येथून आपले शिक्षण पूर्ण केले. तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या 17 व्या वर्षी प्रत्युषाने बालिका वधू या मालिकेत आनंदीची व्यक्तिरेखा साकारुन घराघरांत वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रत्युषा फक्त दहावीपर्यंत शिकली होती.

बातम्या आणखी आहेत...