आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

'गुडिया हमारी सभी पे भारी':गुडिया व गुड्डू यांच्‍यातील वाद जाणार टोकाला, गुड्डू गुडियाच्‍या घरामध्‍ये येऊन त्‍यांना देणार आहे धमकी  

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पडद्यामागे गुडिया व गुड्डू एकमेकांचे चांगले मित्र असले तरी पडद्यावर त्‍यांच्‍यामध्‍ये वादविवाद आहेत.
Advertisement
Advertisement

अँड टीव्‍हीवरील मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी' ही गुडियाची (सारिका बेहरोलिया) जीवनकथा दाखवणारी मालिका आहे. ती जीवनाला तिच्‍या अनोख्‍या पद्धतीने प्रतिसाद देते. गुडियाचा विवाह हा तिचे आईवडिल सरला (समता सागर) आणि राधे (रवी महाशब्‍दे) यांच्‍यासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. आगामी एपिसोड्समध्‍ये नवीन पात्रे सादर केली जाणार आहेत. प्रेक्षकांना नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. गुडिया तिच्‍या जुन्‍या क्‍लुप्‍त्‍यांसह गुड्डूला (करम राजपाल) धडा शिकवण्‍याचा प्रयत्‍न करते. ती हा लढा जिंकेल का की गुडिया पडेगी गुड्डू पे भारी? याचा उलगडा आगामी एपिसोड्समध्‍ये पाहायला मिळणार आहे. 

भोलीसी गुडिया आणि खानदानी गुंडा गुड्डू यांच्‍यामधील युद्धाला सुरूवात झाली होती. गुडिया साध्‍याभोळ्या कुटुंबातील आहे, तर गुड्डू वडिलोपार्जित दरोडेखोर असलेल्‍या कुटुंबातील आहे. एपिसोडमध्‍ये गुडियाला त्‍याचे सत्‍य समजते, पण ती त्‍याची खोड काढण्‍यापासून थांबत नाही. ती गुड्डूला संकटात अडकवण्‍यामध्‍ये मास्‍टरमाइण्‍ड असणार आहे. तिची त्‍याला व त्‍याच्‍या कुटुंबाला तिच्‍या शहरामधून बाहेर काढण्‍याची इच्‍छा आहे. त्‍याच्‍याकडून वारंवार चेतावणी होत असताना देखील ती त्‍याच्‍यासोबत वाद करतच राहते आणि प्रत्‍येकवेळी ती यशस्‍वी ठरते. एकमेकांवर पाणी फेकण्‍यापासून आता शेण फेकण्‍यापर्यंत गुडिया व गुड्डू यांच्‍यामधील वादविवाद वाढतच आहेत.

गुड्डूसोबतच्‍या संघर्षाबाबत बोलताना 'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये गुडियाची भूमिका साकारणारी सारिका बेहरोलिया म्‍हणाले, ''गुडिया का तो काम ही है सब पे भारी पडना! मी फक्‍त माझे काम करत आहे (हसते). विनोदांचा भाग बाजूला ठेवला तर मी या एपिसोडसाठी करमसोबत शूटिंग करताना खूप धमाल केली. तुम्‍हाला हे सर्व विनोद व खोडी पाहताना खूप धमाल येईल. मग विचार करा आम्‍ही या सीक्‍वेन्‍सेसच्‍या शूटिंगच्‍या वेळी किती धमाल केली असेल! गुड्डू व गुडियामधील स्थिती बिकट झाली आहे आणि ती अधिक बिकट होऊ शकते. गुडिया गुड्डूला संकटात पाडण्‍यासाठी करत असलेली कृत्‍ये पाहून प्रेक्षकांना आनंद होईल.'' 

खोड्या काढण्‍याच्‍या या एपिसोडसाठी शूटिंग करण्‍याच्‍या अनुभवाबाबत बोलताना करम राजपाल उर्फ गुड्डू म्‍हणाला, ''एपिसोड्ससाठी शूटिंग करताना खूप धमाल आली. मी गुडियाच्‍या मला संकटामध्‍ये टाकण्‍याच्‍या कृत्‍यांमुळे हतबल झालेलो दिसणार असलो तरी मी गुडियाला तिच्‍याच जाळ्यामध्‍ये अडकवण्‍याची धमाल केली आहे. माझी भूमिका सहनशीलता असेपर्यंतच विनम्र दाखवण्‍यात आली आहे. गुडिया एपिसोडमध्‍ये असे काहीतरी करते, ज्‍यामुळे ती मर्यादा ओलांडते आणि स्थिती झटक्‍यात वाईटावरून बिकट होऊन जाते.'' 

पडद्यामागे गुडिया व गुड्डू एकमेकांचे चांगले मित्र असले तरी पडद्यावर त्‍यांच्‍यामध्‍ये वादविवाद आहेत. हा एपिसोड गुड्डूचे गुपित उघडकीस आणणार आहे. गुड्डूचे कुटुंब काय करू शकते हे माहित असताना देखील गुडियाची ''अत्‍यंत बेपर्वा'' वृत्ती गुडिया व तिच्‍या कुटुंबासाठी समस्‍या निर्माण करेल. स्थिती इतकी हाताबाहेर निघून जाईल की गुड्डू गुडियाच्‍या घरामध्‍ये येऊन त्‍यांना धमकी देणार आहे आणि पोलिसांकडे गुडियाविरोधात तक्रार करणार आहे. गुडिया आता काय करेल? ती गुड्डू व त्‍याच्‍या कुटुंबाला शहरातून निघून जाण्‍यास कशाप्रकारे भाग पाडेल? की ती माफी मागून गुड्डूशी मैत्री करेल? या सर्व गोष्‍टींचा उलगडा आगामी एपिसोड्समध्‍ये पाहायला मिळेल.

Advertisement
0