आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मेरी हानिकारक बीवी' फेम अभिनेत्रीचे निधन:फिल्म आणि टीव्ही अभिनेत्री लीना आचार्य काळाच्या पडद्याआड, किडनी फेल झाल्यानंतर दिल्लीमध्ये घेतला अखेरचा श्वास

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक महिन्यापुर्वीपासून करत होती मृत्यूसंबंधीत पोस्ट

फिल्म आणि टीव्ही अभिनेत्री लीना आचार्यचे किडनी फेल झाल्याने निधन झाले आहे. शनिवारी दिल्लीमध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. 'सेठजी' या मालिकेत तिचा को-अॅक्टर राहिलेला वरशिप खन्नानुसार लीना जवळपास दीड वर्षांपासून किडनीच्या आजाराचा सामना करत होती. लीनाला 'हिचकी' चित्रपटाव्यतिरिक्त वेब शो 'क्लास ऑफ 2020' आणि 'सेठजी', 'आपके आ जाने से' आणि 'मेरी हानिकारक बीवी' या सीरियल्ससाठीही ओळखले जात होते.

को-अॅक्टर रोहन मेहराने केली आठवण
'क्लास ऑफ 2020' या वेब शोमध्ये लीनाचा को-अॅक्टर राहिलेला रोहन मेहराने अभिनेत्रीची आठवण काढत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे, 'तुमच्या आत्म्याला शांती मिळो लीना आचार्य मॅम. गेल्या वर्षी याच काळात आपण 'क्लास ऑफ 2020' ची शूटिंग केली होती. तुमची नेहमी आठवण येईल.'

एका किडनीवर जिवंत होती लीना
'सेठजी' या मालिकेत लीनाचा को-अॅक्टर राहिलेला वरशिप खन्नाने एका इंग्रजी न्यूज वेबसाइटसोबत बोलताना म्हटले की, 'अभिनेत्री गेल्या दिड वर्षांपासून आजाराचा सामना करत होती. काही काळापुर्वी तिच्या आईने तिला किडनी डोनेट केली होती, पण ती सर्व्हाइव्ह करु शकली नाही.'

वरशिपने पुढे म्हटले, 'मला माहिती होते की, तिला 2015 पासून हेल्थ प्रॉब्लम होता. ती एका किडनीवर जगत होती आणि काम करत होती. गेल्या चार महिन्यात तिला अनेक प्रकारचे आजार झाले आणि ती वाचू शकली नाही. ती अनुभवी अभिनेत्री होती आणि नेहमी स्मरणात राहिल.'

एक महिन्यापुर्वीपासून करत होती मृत्यूसंबंधीत पोस्ट
लीनाने 3 नोव्हेंबरला इंस्टाग्रामवर आपली अखेरची पोस्ट केली होती. यामध्ये ती पिंक साडी, ज्वेलरी आणि मेकअपमध्ये दिसत होती. यापूर्वी 21 अक्टोबरला तिने एक कोट शेअर केला होता. यामध्ये लिहिले होते की, चंद सांसें ही हैं, जो उड़ा ले जाएगी। और इससे ज्यादा मौत क्या ले जाएगी।'

यानंतर 24 अक्टोबरलाही तिने जीवन आणइ मृत्यूसंबंधीत असेच कोट सोशल मीडियावर शेअर केले होते. जे पाहून वाटते की, लीनाला तिच्या मृत्यूची जाणीव पहिलेच झाली होती.

बातम्या आणखी आहेत...