लॉकडाउनदरम्यान लोकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनवर परत येत आहे 'महाभारत' आणि 'रामायण'


  • एकेकाळी या दोन्ही कार्यक्रमामुले शहरे ओसाड पडलेली दिसायची

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 03:46:34 PM IST

टीव्ही डेस्क- एक काळ होता, जेव्हा रामायण आणि महाभारत टीव्हीवर टेलीकास्ट झाल्यावर शहर ओसाड पडलेली दिसायची. आजही शहर ओसाड झाली आहेत, पण त्याला कारण वेगळं आहे. पण, यातच आता दूरदर्शनने घरात कैद झालेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी रामायण आणि महाभारत परत एकदा टेलीकास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.


रामानंद सागर यांचा 'रामायण' आणि बी.आर. चोप्रा यांचा 'महाभारत' नव्वदीच्या काळातील लोकांचा आवडता शो होता. टीव्हीवर या शोची वेळ लोक आपापल्या घरात कार्यक्रम पाहायला जायचे आणि त्यामुळे शहरे ओसाड पडायची. लोक आपली चप्पल काढून शो पाहायचे, काही लोक टीव्हीची पुजा करायचे. या दोन कार्यक्रमांची टीव्ही इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद आहे, आणि या दोन्ही कार्यक्रमांना कधीही लोक विसरू शकणार नाहीत. आज जेव्हा लॉकडाउनमुळे शहर ओसाड पडले आहेत, सोशल मीडियावर लोकांनी हे दोन्ही कार्यक्रम परत टेलीकास्ट करण्याची मागणी केली आहे.


याबाबत प्रसार भारती (दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ)चे सीईओ शशी शेखर म्हणाले की, सध्या हे दोन्ही कार्यक्रम टेलीकास्ट करण्यावर चर्चा सुरू आहे. ज्यांच्याकडे या दोन्ही 'रामायण' आणि 'महाभारत'चे मालकी हक्क आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन, पुढील पाउले उचलली जातील. यातच सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील या गोष्टीची पुष्टी केली आहे की, दूरदर्शनवर 'रामायण' आणि 'महाभारत' परत येणार आहेत.


रामायणात अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी राम-सीता यांचे पात्र साकारले होते. लोक यांना खरेखुरे राम आणि सीता समजून यांचे आशीर्वाद घ्यायचे. काही दिवसांपूर्वी रामायणाची संपूर्ण टीम कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते.

X