आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनात शूटिंगला परवानगी:बालकलाकारांच्या पालकांच्या मनात संभ्रम, 60 वर्षांहून अधिकचे कलाकार सरकारी गाइडलाइनच्या बाजुने

मुंबई (किरण जैन)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास सशर्त मान्यता देण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement

लॉकडाऊननंतर महाराष्ट्र सरकारने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. शासनाने यासाठी 16 पानांची गाइडलाइन दिली आहे. या नवीन गाइडलाइननुसार, 10 वर्षांखालील मुलांना आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ कलाकारांना सेटवर परवानगी नाही.

'छोटी सरदारनी' या मालिकेत परमची मुख्य भूमिका सहा वर्षीय बालकलाकार केविना टाक साकारत आहे. केविनाची आई शुभम टाक यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या शूटिंगच्या तारखा आधीच मिळाल्या आहेत. ती सध्या तिच्या फायनल कन्फर्मेशची वाट बघत आहे.

आई शुभम टाकसोबत केविना

शुभम म्हणाल्या, "आतापर्यंत आम्हाला चॅनलकडून कोणत्याही प्रकारच्या बदलांविषयी माहिती देण्यात आलेली नाही. जर आमची मुलगी शूटसाठी गेली तर काही गोष्टी आमच्या बाजूलाच्या देखील मांडल्या जातील."

काही बालकलाकारांचे पालक आणि कलाकारांसोबत दिव्य मराठीने बातचीत केली.

वडील विवेक भटनागरसोबत ऑरा भटनागर

"माझी मुलगी ऑरा 'बॅरिस्टर बाबू'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. आम्हाला अद्याप मार्गदर्शक तत्त्वांविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.  शूटिंग सुरु झाल्यास आम्ही आमच्या मुलीसोबत सेटवर हजर राहू. सावधगिरी बाळगू आणि आपल्या मुलीची काळजी घेऊ. आम्ही तिची खूप काळजी घेतोय. ऑराच्या शूटिंगविषयी मला काही अडचण नाही. तथापि, आता हे चॅनेलवर अवलंबून आहे." - विवेक भटनागर, 9 वर्षीय बाल कलाकार ऑरा भटनागरचे वडील

आईवडिलांसोबत बालकलाकार तन्मय शाह

"ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत तन्मय शाह हा बालकलाकार कार्तिक आणि नायराच्या मुलाची भूमिका साकारत आहे. तन्मयचे वडील ऋषी शाह म्हणाले, 'मी सरकारी आदेशाशी सहमत आहे. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि त्यांना या वातावरणात बाहेर जाऊ देणे खूप चुकीचे ठरेल. माझे प्रॉडक्शन टीमशी बोलणे झाले आहे आणि आम्ही हा निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत हा विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत माझा मुलगा शूट करणार नाही. आयुष्यापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही."

अभिनेत्री सुहासिनी मुळे

"माझ्या मते, वयापेक्षा आपण आधी अशा लोकांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यांना पुर्वीपासूनच काही आजार आहेत. बर्‍याच तरुणांना डायबिटीज आणि हायपर टेन्शनचा त्रास आहे.  त्यांच्यात रोगप्रतिकार शक्तीही कमी असते. आपला देश डाइबिटीजचे कॅपिटल आहे. ते कसे टाळायचे? माझ्या मते, टीमने वयापेक्षा मेडिकल हिस्ट्रीवर आधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे." - सुहासिनी मुळे, 69 वर्षीय अभिनेत्री

अभिनेत्री उषा राणा

"सरकारने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे बरोबर आहे. वयाच्या साठीनंतर रोग प्रतिकारशक्तीत लक्षणीय घट होते. अर्थात प्रतिकारशक्ती कमी झाली तर हा विषाणू आपल्या शरीरात सहज शिरू शकतो. गेल्यावर्षी  'ये है मोहब्बतें' ही मालिका संपल्यानंतर मी कामाच्या शोधात होते, परंतू लॉकडाऊनमुळे आतापर्यंत कोणताही प्रोजेक्ट मिळालेला नाही.' - उषा राणा, 63 वर्षीय अभिनेत्री

Advertisement
0