आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'कौन बनेगा करोडपती'च्या नवीन पर्वाचा प्रोमो प्रेक्षक आता शॉर्ट फिल्मच्या रुपात बघू शकतील. दिग्दर्शक नितेश तिवारी प्रथमच दीर्घ स्वरुपातील फिल्म तीन टप्प्यात सादर करणार आहेत. या शॉर्ट फिल्मचे शीर्षक सम्मान असे आहे. शोचे मेकर्स ही शॉर्ट फिल्म आपल्या सोशल मीडियावर प्रमोट करणार आहेत. दरवर्षी शोचे मेकर्स प्रमोशनसाठी प्रोमो बनवत होते. मात्र यंदा पहिल्यांदाच ते तीन भागात शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून शोचे प्रमोशन करणार आहेत.
चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील बेरचा येथे झाले
चित्रपट निर्माते नितेश तिवारी संकल्पित, लिखित आणि दिग्दर्शित दीर्घ स्वरुपातील चित्रपट प्रथमच तीन टप्प्यांत सादर केला जाईल. विशेषत: मध्य प्रदेशातील बेरचा येथे चित्रीत या चित्रपटात स्टेज आणि फिल्ममधील कामगिरीकरिता प्रसिद्ध असलेला ओंकार दास मणिपुरी याने अभिनय केला आहे. कथानकात स्थानिक प्रतिभेची जोड मिळाल्याने चित्रपटात अधिक सिनेमॅटिक अनुभव मिळाला. बेरचासारख्या खऱ्या खेड्यात फिल्म चित्रीत करण्यामागील कल्पना म्हणजे, केबीसी देशातील अगदी दुर्गम भागातील लोकांनाही कसे आपलेसे करतो, हे त्यातून दाखवायचे आहे.
फिल्म एका प्रासंगिक परिदृश्याने सुरु होते. प्रासंगिक पात्र आणि कथा, विनोदी छटांद्वारे प्रेक्षकांना अनपेक्षित रितीने गुंतवून ठेवते. कथाकथनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितेश तिवारी यांनी तीन भागातील ‘सम्मान’ शॉर्ट फिल्मच्या माध्यामातून मानवी भावना आणि महत्त्वाकांक्षा यांना पुन: जिवंत केले आहे.
कोविडमुळे शोच्या फॉर्मेटमध्ये बदल नाही
'कौन बनेगा करोडपती 13' लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतील. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये हा शो प्रसारित होणार आहे. शोच्या फॉर्मेटबद्दल सांगायचे म्हणजे, कोरोनामुळे मागील पर्वाप्रमाणेच यंदाही या कार्यक्रमाची सिलेक्शन पद्धती पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चार टप्पे पार करावे लागणार आहेत. म्हणजे 'कौन बनेगा करोडपती 13' कार्यक्रमात नोंदणी करण्यापासून निवड होण्यापर्यंत चार टप्पे आहेत. नोंदणी, छाननी, ऑनलाइन ऑडिशन आणि मुलाखत असे हे चार टप्पे आहेत.
याशिवाय मागील सीझनप्रमाणेच यंदाही ऑडिअन्स पोलऐवजी व्हिडिओ अ फ्रेंड या लाइफलाइनचा वापर केला जाईल. 15 प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा स्पर्धक सात कोटी रुपये जिंकू शकतो.
केबीसी हा शो 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 मध्ये लाँच झाला होता. या शोने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. तिसरे पर्व वगळता सर्व सीझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले आहेत. या शोचा टीआरपी कायम टॉपमध्ये राहिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.