आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टिकटॉकवर बंदी:मलायका अरोरा, निया शर्मा आणि रश्मी देसाईसह अनेक कलाकारांनी केले निर्णयाचे स्वागत, काम्या पंजाबी म्हणाली - ही चांगली बातमी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारांनी टिकटॉकवरील बंदीवर आनंद व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. यात भारतात लोकप्रिय असणा-या टिकटॉकचाही समावेश आहे. देशात टिकटॉकचे 20 कोटींपेक्षा अधिक यूजर्स आहेत.  मलायका अरोरा, काम्या पंजाबी, निया शर्मा, कुशल टंडन यांनी  सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून टिकटॉकवरील बंदीवर आनंद व्यक्त केला आहे. 

अभिनेत्री मलायका अरोराने टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्यांचा फोटो काढला आणि तो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ठेवला. ज्यात तिने लिहिले की, 'लॉकडाऊन दरम्यान मला मिळालेली सर्वोत्कृष्ट बातमी ... अखेर आता आम्हाला लोकांचे हास्यास्पद व्हिडिओ बघावे लागणार नाहीत.'

ट्विटरवर बातम्यांचा स्क्रीनशॉट शेअर करत ‘नागिन’ या मालिकेतील अभिनेत्री निया शर्माने लिहिले की, 'आपला देश वाचवल्याबद्दल आभार. टिकटॉक नावाच्या या विषाणुला पुन्हा कधीही येऊ देऊ नका. '

या बातमीविषयी ट्विट करत काम्या पंजाबीने लिहिले की, 'शानदार पंतप्रधान कार्यालय. जबरदस्त बातमी. # जय हिंद # बायकॉट चिनी प्रॉडक्ट्स # बायकॉट चिनी अ‍ॅप्स'

ही बातमी शेअर करताना कुशल टंडनने लिहिले, अखेर…

अभिनेत्री रश्मी देसाई हिने देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘गेल्या काही महिन्यांत प्रचंड ताण तणाव पाहायला मिळतोय, जो लोकांना मानसिकदृष्ट्या प्रभावित करतो आहे. आपल्या सरकारने चीनी अ‍ॅप्स बंद करण्याचा जो काही निर्णय घेतला, निश्चितपणे त्यामागे काही ठोस कारण असणार,’ असे तिने म्हटले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला निर्णय सोमवारी दिल्लीत माहिती आणि तंत्रज्ञान मिनिस्ट्रीची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कलम 69A अंतर्गत एकुण 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतातर्फे बंदी घातलेली आहे. या यादीमध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर, हॅलो या अ‍ॅप्सचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून याबाबत प्रेस रिलीज जारी करण्यात आले आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.