आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून आतापर्यंत अनेक कलाकारांनी एग्झिट घेतली. आता या मालिकेच दिग्दर्शक मालव राजदा यांनीही मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे. 14 वर्षांनंतर त्यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एवढी वर्षे तारक मेहता शोच्या कुटुंबाचा एक भाग राहिल्यानंतर, आपण कम्फर्ट झोनमध्ये आलो आणि त्यामुळे क्रिएटिव्ह विचार करू शकत नाही, असे वाटत असल्याने शो सोडल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, प्रोडक्शन हाऊसशी काही मतभेद झाल्यामुळे मालव यांनी हा शो सोडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 15 डिसेंबर रोजी त्यांनी शेवटचा एपिसोड शूट केला.
चांगले काम करायचे असेल तर टीममध्ये मतभेद होतातच - मालव
प्रोडक्शनशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद होते. यावर आता राजदा म्हणाले की, जेव्हा तुम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी मतभेद कायमच होतात. मुळात म्हणजे प्रोडक्शन हाउसशी माझे काहीच देणे-घेणे नाहीये.
शोचा भाग बनल्याबद्दल आभारी आहेत मालव
मालव राजदा यांनी 14 वर्षांच्या प्रवासाविषयीदेखील सांगितले. "मुळात असित भाई मोदी आणि शोबद्दल मी कृतज्ञ आहे. 14 वर्षे एकाच शोमध्ये काम केल्यामुळे मी कुठेतरी कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. यामुळेच मी बाहेर पडून स्वत: आव्हान देण्याचे ठरवले आहे. तारक मेहता का शोमधील 14 वर्षे माझ्यासाठी खास ठरली आहेत. कारण या शोमध्ये मला माझी प्रिया मिळाली," असे मालव म्हणाले.
रीटा रिपोर्टर देखील शोला ठोकू शकते रामराम
मालव राजदा आणि प्रिया आहुजा राजदा यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते. दोघांनीही या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली. अशा परिस्थितीत मालव यांच्यानंतर प्रिया म्हणजेच रीटा रिपोर्टरही शो सोडू शकते, असे लोकांचे म्हणणे आहे. तिची निर्मात्यांशी चर्चाही सुरू आहे.
याआधी या सेलिब्रिटींनी सोडला शो
हा शो यापूर्वी दिशा वकानी (दया भाभी), जिल मेहता (सोनू), निधी भानुशाली (सोनू), भव्य गांधी (टप्पू), मोनिका भदोरिया (बावरी), गुरचरण सिंग (सोढी), लाल सिंग मान (सोढी), यांनी सोडला होता. दिलखुश रिपोर्टर (रोशन) सोढी, नेहा मेहता (अंजली भाभी) यांनी या शोचा निरोप घेतला.
याशिवाय दिवंगत अभिनेते घनश्याम नायक (नट्टू काका) यांचे गेल्या वर्षी निधन झाले. तर कवी कुमार आझाद (डॉ. हाथी) यांचे 2018 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.