आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Manish Paul Will Celebrate Birthday Through Face Time, Said 'No Matter How Expensive Gifts Someone Gives, A Gift Given By A Mother Will Always Be Special'

40 वर्षांचा झाला अभिनेता:फेस टाइमद्वारे मनीष पॉलने साजरा केला वाढदिवस, म्हणाला - 'कितीही महागड्या भेटवस्तू मिळाल्या तरीही आईची भेट बहुमोल ठरते'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईने दिलेले ते गिफ्ट विशेष असते

अभिनेता व सूत्रसंचालक मनीष पॉलने मंगळवारी आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने दिव्य मराठीशी विशेष बातचीतदरम्यान त्याने वाढदिवसाशी संबंधित आठवणी सांगितल्या...

यावर्षी ऑनलाइनच पार्टी करणार
गेल्या दोन वर्षांपासून आपण सर्व कोरोना महामारीत अडकलो आहोत, अजूनही ती गेलेली नाही. मात्र, या वर्षी माझे कुटुंब माझ्यासोबत आहे, एक- दोन जणही येतील शुभेच्छा द्यायला. तसेच आम्ही फेसटाइमवर पार्टी करणार आहोत. मला माझा वाढदिवस साजरा करणे खूप आवडते. या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र असते आणि सर्वजण मला विशेष वागणूक देतात. खरे सांगायचे तर या दिवसासाठी माझी मुले माझ्यापेक्षा जास्त उत्साहित असतात. दरवर्षी ते माझ्यासाठी काही ना काही तरी सरप्राइझ आणतात.

आईने दिलेले ते गिफ्ट विशेष असते
गिफ्टमध्ये मला आठवते माझ्या आईने लहानपणी मला ही-मॅनचा सेट भेट दिला होता. ती माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात स्मरणीय भेट आहे. काही वर्षांपूर्वी मी आणि माझी आई जुन्या आठवणी काढत असताना त्या गिफ्टचा उल्लेख झाला. तिने मला पुन्हा ही-मॅनचा सेट विकत घेऊन मुंबईला पाठवला. त्यादिवशी खूप आनंद झाला. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. आता कोणी कितीही महागडे गिफ्ट का देईना, आईचे ते गिफ्ट नेहमीच विशेष राहिल.

करण, किरणजी आणि माधुरीसोबत साजरी केली पार्टी
अविस्मरणीय बर्थडे पार्टी करण जोहर, किरण खेर आणि माधुरी दीक्षितसोबत साजरी केली आहे. मी 'इंडियाज गाॅट टॅलेंट' आणि 'झलक दिखला जा'चे शूटिंग करत हाेतो. त्यावेळी आम्ही स्पेशल पार्टी करत होतो आणि खूप धमाल करायचो.

बातम्या आणखी आहेत...