आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण व गुन्हेगारी विश्वामध्ये फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे शक्य व अशक्य. आपण विचार करत असलेल्या अशक्य गोष्टी गुन्हेगारी विश्वामध्ये शक्य आहेत. आपल्यासमोर अशक्य गुन्ह्यांच्या कथा सादर होतात, तेव्हा अशा कथा आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात की हे कसे घडू शकते? तुमच्या कल्पनाशक्तीला आव्हान करणा-या आणि तुम्हाला अबोल करणा-या अशक्य गुन्ह्यांच्या असाधारण कथा घेऊन येत आहे एण्ड टीव्हीवरील नवीन लक्षेवधक साप्ताहिक क्राइम मालिका 'मौका-ए-वारदात'. मालिकेमध्ये मनोज तिवारी, रवी किशन व सपना चौधरी अकल्पनीय गुन्ह्यांची झलक दाखवतील.
या शोविषयी मनोज तिवारी म्हणाला, ''मला या मालिकेचा भाग होण्याचा आनंद होत आहे. गुन्हा अत्यंत भयानक आहे आणि अनेकदा आपल्या जीवनातील अनियंत्रित असा भाग आहे. गुन्हा घडतो तेव्हा सर्वांना धक्का बसतो. सर्वांमध्ये गुन्ह्यामागील हेतू, गुन्हा का घडला व कसा घडला हे जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण होते. पण 'मौका-ए-वारदात' ही मालिका कल्पनेपलीकडील असून विश्वासापलीकडे असलेल्या गुन्ह्यातील रहस्यांना सादर करते आणि लोकांना विचार करण्यास भाग पाडते की 'हे असे कसे झाले?'
रवी किशन म्हणाला, ''दररोज आपण आसपास अनेक गुन्हे घडल्याचे वाचतो किंवा त्याबाबत ऐकायला मिळते. अशा घटना निश्चितच त्रासदायक आहेत, पण काही घटना धक्कादायक व आश्चर्यचकित करतात. त्यामधील दुष्टपणासोबत प्रश्न पडतो की असा अशक्य गुन्हा कसा घडला? मी विविध मालिकांचा भाग राहिलो आहे, पण 'मौका-ए-वारदात'ची संकल्पना सर्वात अविश्वसनीय गुन्ह्यांच्या लक्षवेधक कथांमुळे पूर्णत: नवीन आहे.''
सपना चौधरी म्हणाली, ''मौका-ए-वारदात मालिकेमध्ये प्रमुख महिला पात्राच्या दृष्टिकोनातून कथाकथन करण्यात आले आहे, जी या मालिकेबाबत मला लक्षणीय बाब वाटली. हे पात्र या अकल्पनीय गुन्ह्यांमागील रहस्यांचा उलगडा करेल, जी या मालिकेची खासियत आहे आणि मालिका पाहण्यासाठी रोमांचक बाब आहे.''
रवीराज क्रिएशन्स, हेमंत प्रभु स्टुडिओज, एण्ड आय प्रॉडक्शन्स आणि स्पेसवॉकर फिल्म्स निर्मित 'मौका-ए-वारदात' 9 मार्चपासून सुरू होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.