आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णा अभिषेकने ठोकला 'द कपिल शर्मा शो'ला रामराम:कुणाशी झाले कपिलचे भांडण तर कुणाला आवडली नाही भूमिका

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपिल शर्मा शोचा नवा सीझन येत आहे, पण आता या शोमध्ये सपनाच्या भूमिकेत दिसणा-या कृष्णा अभिषेकने या शोला रामराम ठोकला आहे. एका मुलाखतीत कृष्णाने सांगितल्यानुसार, कॉन्ट्रॅक्टच्या अडचणींमुळे त्याने हा शो सोडला आहे. हा शो 2016 पासून सुरू झाला. तेव्हापासून, कृष्णा व्यतिरिक्त, उपासना सिंग, अली असगर, सुनील ग्रोव्हर आणि सुगंधा मिश्रा यांसारख्या अनेक विनोदी कलाकारांनी या शोमधून काढता पाय घेतला.

सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. त्यांच्यातील वाद विकोला गेल्यानंतर सुनीलने या शोला रामराम ठोकला होता. कपिल शर्माने सुनील ग्रोवरच्या कानशिलात लगावल्यानंतर त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. या शोमध्ये सुनीलने गुत्थी आणि डॉ. मशहूर गुलाटी ही पात्रे साकारली होती.

उपासना सिंग

या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये उपासना सिंग बुवाच्या भूमिकेत दिसली होती. काम एन्जॉय करता येत नव्हते आणि त्यामुळे कामाचे समाधान मिळत नव्हते म्हणून शोमधून एक्झिट घेतली, असे एका मुलाखतीत उपासना सिंगने म्हटले होते. उपासना सिंगने सांगितल्यानुसार, ती आणि कपिल अजूनही खूप चांगले मित्र आहेत. हा शो खूप हिट झाला होता आणि कपिल चांगली फी देखील देत होता म्हणून पैशांसाठी हा शो बरेच दिवस सोडला नसल्याचेही ती म्हणाली होती.

अली असगर

अली असगर या शोमध्ये दादीसह अनेक पात्रांमध्ये दिसला होता, परंतु तो 2017 पासून या शोचा भाग नाही. रिपोर्ट्सनुसार, त्याने क्रिएटिव्ह मतभेदांमुळे शो सोडला. आपल्या भूमिकेत नाविन्य नसल्याचे त्याने सांगितले होते. अली असगरच्या मते त्याच त्या पात्रांमुळे त्याला स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला दिसत नव्हता. काम करताना मजा येत नाही असे कारणही त्याने दिले होते.

सुगंधा मिश्रा

सुगंधा मिश्रा या शोमध्ये अनोखी हेअरस्टाइल असलेल्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसली होती. सुनील ग्रोव्हरने शो सोडल्यानंतर काही दिवसांपासून ती देखील या शोचा भाग नव्हती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुनील ग्रोव्हरने शोला रामराम ठोकल्यानंतर शोच्या फॉरमॅटमध्ये अनेक बदल करण्यात आले होते आणि त्यानंतर तिला पुन्हा बोलावण्यात आले नाही.

नवज्योत सिंग सिद्धू​​​​​​​

शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू खास पाहुणे म्हणून दिसत होते. पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धू यांनी पाकिस्तानवर वक्तव्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर लोक द कपिल शर्मा शो आणि सिद्धूवर बहिष्कार घालण्याची मागणी करत होते. या कारणास्तव त्यांना शोमधून वगळण्यात आले होते आणि त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंगची वर्णी शोमध्ये लागली होती. आतासुद्धा अर्चनाच नवज्योत यांच्या जागी शोमध्ये दिसत आहेत.

भारती सिंह

भारती सिंहने या शोमध्ये अनेक भूमिका साकारल्या. पण ब-याच काळापासून ती या शोमध्ये दिसली नाही. खरं तर काही महिन्यांपूर्वीच आई झालेल्या भारती सिंहने काही दिवसांपूर्वीच या शोचा भाग नसणार असल्याचा खुलासा केला होता. काही रिअलिटी शो ती होस्ट करत असल्याने तिला या शोच्या शूटिंगसाठी वेळ देता येणे शक्य नसल्याचे तिने म्हटले होते. याशिवाय तिने स्वतःचा डिजिटल गेम शो देखील सुरू केला आहे आणि ती तिच्या चॅनलवर ब्लॉग बनवत असते.

बातम्या आणखी आहेत...