आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील 'मेरे साई- श्रद्धा और सबुरी' मालिकेत तुषार दळवी हा प्रसिद्ध कलाकार साईंची मध्यवर्ती भूमिका करत आहे आणि आता मालिकेतील पुढील कथानकासाठी मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची मालिकेत एंट्री होत आहे. भार्गवीने अनेक मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे.
या मालिकेच्या आगामी कथानकात भार्गवी चिरमुले एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती चंद्रा बोरकर नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी साईंची बहीण आहे आणि दोन मुलं असलेले तिचे सुखी कुटुंब आहे. परंतु, एके दिवशी तिचा नवरा ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या कुटुंबाला सोडून निघून जातो, कारण कुटुंबाप्रती असलेल्या आपल्या जबाबदार्या म्हणजे त्याला आपल्या मार्गातला अडथळा वाटतो. स्वाभाविकपणे चंद्रावर आकाशच कोसळते. साई आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतात की, आपल्या जबाबदार्या पूर्ण केल्यावरच ज्ञानप्राप्ती होते.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, “मेरे साई मालिकेतल्या या महत्त्वाच्या कथानकात सहभागी होता आल्याचा आणि साईंच्या बहिणीची भूमिका साकारण्याचा मला आनंद आहे. मला वाटते की, मेरे साई ही भारतीय टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त प्रसार असलेली मालिका आहे, आणि ती सकारात्मकता पसरवते. त्यात जे मुद्दे कथानकाच्या माध्यमातून हाताळण्यात येतात, ते आजच्या काळाशी देखील इतके संबद्ध आहेत की, प्रेक्षकांना प्रत्येक कथेतून काही ना काही बोध मिळतो. साई बाबांनी स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला नाही, आणि ते नेहमी खर्याच्या बाजूने उभे राहिले. या कथानकात देखील हेच पुन्हा दिसून येईल. ते चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतील की, महिला पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नसतात.” या भूमिकेच्या माध्यमातून साईंनी माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव केला आहे, असेही भार्गवी म्हणाली.
आपल्या पतीने आणि कुटुंबाने सोडून दिलेल्या स्त्रीला आपल्या समाजात किती त्रास सोसावा लागतो याचे चित्रण या भागात दिसेल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.