आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सलमान खानने अलीकडेच 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या 14 व्या सीझनचा प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे हिंदीतील या शोबद्दलची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. तसंच यंदाच्या पर्वात कोणकोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी होतील, हे जाणून घेण्यासही प्रेक्षक आतुर आहेत.
आतापर्यंत बरीच नावे समोर आली आहेत, परंतु सुत्रांच्या माहितीनुसार, सेलिब्रिटींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, "निर्मात्यांनी अशा स्पर्धकांची निवड केली आहे ज्यांचा आधीच 'बिग बॉस'शी काहीतरी संबंध राहिला आहे किंवा त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे यावर्षी चर्चा एकवटली आहे.
यंदा घरात प्रवेश करणा-या दोन सेलिब्रिटींची नावे समोर आली आहे. पहिले नाव आहे गायक-संगीतकार अनू मलिक आणि दुसरे नाव आहे टीव्ही अभिनेता आमिर अली. एकीकडे अनू मलिक मी टू आरोपांमुळे चर्चेत राहिले तर दुसरीकडे आमिर अलीचा पत्नी संजिदा शेखसोबतच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले गेले होते. या दोन्ही सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या कारणांमुळे भरपूर चर्चा एकवटली होती. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांना अप्रोच केले होते. दोघांनीही या शोसाठी आपला होकार निर्मात्यांना कळवला आहे. गेल्या वर्षी अनू मलिक यांचा धाकटा भाऊ अबू मलिक शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
या शोमध्ये सहभागी होणा-या सेलिब्रिटींमध्ये नैना सिंह, पवित्रा पुनिया, जास्मीन भसीन, नेहा शर्मा, विव्हियन डिसेना, जान खान, शगुन पांडे, स्नेहा उल्लाल, डोनल बिष्ट, आलिशा पंवर, आकांक्षा पुरी ही नावे आतापर्यंत समोर आली आहेत. तथापि, निर्मात्यांनी अधिकृतपणे या नावांची पुष्टी केली नाही.
View this post on InstagramA post shared by Aamir Ali (@aamirali) on Aug 31, 2020 at 6:01am PDT
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 'बिग बॉस' घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्व स्पर्धकांची कोरोना टेस्ट केली जाईल. याशिवाय कोरोनापासून संरक्षणाच्या सर्व सुविधा घरात उपलब्ध असतील. या शोमध्ये यावर्षी 16 स्पर्धक दिसणार आहेत, यामध्ये 13 सेलिब्रिटी आणि 3 सामान्य लोकांचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.