आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोडीदाराच्या शोधात प्रसिद्ध गायक:मिका सिंग थाटणार नॅशनल टीव्हीवर स्वयंवर, देशभरातील स्पर्धक होणार सहभागी

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिका या शोबद्दल खूप एक्साइटेड आहे

अनेक सेलिब्रिटींनी टीव्हीच्या माध्यमातून स्वयंवर थाटून आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधला आहे. आता या यादीत गायक मिका सिंगचेही नाव सामील होणार आहे. गायक लवकरच नॅशनल टीव्हीवर स्वयंवर थाटून आपला जोडीदाराचा शोध पूर्ण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शोसुद्धा यापूर्वी झालेल्या रिअॅलिटी शोसारखाच असेल. येत्या काही महिन्यांत हा शो टेलिकास्ट करण्याची योजना आखली जात आहे.

मिका या शोबद्दल खूप एक्साइटेड आहे
मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले आहे की, मिका या शोमध्ये लग्न करणार नसून केवळ साखरपुडा करेल. त्यानंतर तो त्यांचे नाते पुढे नेईल. स्वतः मिका या शोबद्दल खूप एक्साइटेड आहे. त्याचबरोबर या शोमध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक देशभरातून येणार आहेत. मात्र, हा शो कोणत्या चॅनलवर प्रसारित होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राहुल महाजनने शोच्या माध्यमातून केले होते लग्न
नॅशनल टीव्हीवर स्वयंवर थाटणारा मिका सिंग हा पहिला सेलिब्रिटी नाही. याआधीही नॅशनल टीव्हीवर स्वयंवरचे बरेच सीझन येऊन गेले आहेत. टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत, राखी सावंत आणि मल्लिका शेरावत यांनीही स्वयंवरच्या माध्यमातून त्यांचे जोडीदार निवडले होते, मात्र या तिघींनीही शोमध्ये निवडलेल्या व्यक्तीशी लग्न थाटले नाही.

पण राहुल महाजनने 25 वर्षीय बंगाली मॉडेल डिंपी गांगुलीची या शोमध्ये जोडीदार म्हणून निवड केली होती. यानंतर त्याने डिंपीसोबत लग्न थाटले होते. 2010 मध्ये 'राहुल दुल्हनिया ले जायेंगे' या शोमध्ये राहुलने डिंपीची जोडीदाराच्या रुपात निवड केली होती. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेर 2015 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...