आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावर मिथून दांची वर्णी:एव्हरग्रीन रेखानंतर आता मिथून चक्रवर्ती झळकले टीव्ही शोच्या प्रोमोमध्ये, प्रेक्षकांना सांगणार कोण आहे 'चीकू की मम्मी दूर की'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री रेखा अलीकडेच स्टार प्लस वाहिनीच्या 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या प्रोमोत झळकल्या होत्या. आता मिथून दासुद्धा टीव्ही मालिकेच्या प्रोमोतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

स्टार प्लस वाहिनीचा आगामी शो 'चीकू की मम्मी दूर की' आपल्या पहिल्या प्रोमोपासूनच सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे. हा शो आई-मुलीचे प्रेमळ नाते दाखवतो आणि त्यांच्यामध्ये नृत्य हा सामायिक धागा आहे. जेव्हा प्रोमोने दर्शकांना खिळवून ठेवलेच आहे तिथे स्टार प्लसने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक धमाका करण्याचा निर्णय घेतला आहे. शोच्या निर्मात्यांनी 'चीकू की मम्मी दूर की'च्या नवीन प्रोमोसाठी बॉलिवूडचे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांना सहभागी करून घेतले आहे.

'चीकू की मम्मी दूर की'चा हा नवा प्रोमो मिथून दांच्या तेजस्वी व्यक्तित्व आणि आकर्षक आवाजात इतका आकर्षक वाटत आहे की चाहते शोच्या लॉचिंगची आतुरतेने वाट पहात आहेत. निश्चितच, हा प्रोमो पाहिल्यानंतर कोणीही म्हणेल, वाह! क्या बात है!!

निर्माता गुल खान याविषयी म्हणतात की, "आज दर्शकांकडे कंटेंटसाठी अनेक विकल्प आहेत, हे लक्षात घेऊन दर्शकांच्या विकसित आवडीला कथानकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आम्ही आमचा आगामी शो 'चीकू की मम्मी दूर की'साठी देखील केले आहे. हा एक सुंदर शो आहे ज्यामध्ये आई आणि मुलीमधला द्वेष, भावना आणि एक प्रेमळ बंध दर्शवतो जो परिस्थितीमुळे वेगळे झाल्यानंतर देखील नृत्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत जोडून ठेवतो."

त्या पुढे म्हणाल्या की, "मिथुन चक्रवर्ती यांची जीवन कहानी, जे स्वतः एक लीजेंड आहेत आणि प्रसिद्ध होण्याआधी त्यांनी खूप कठिण परिस्थितीचा सामना केला आहे, या कहाणीतील चीकू सारखीच आहे. यासाठी आम्हाला वाटले कि त्यांच्या उपस्थितीने वास्तविकतेशी जोडून घेता येईल. त्यांचे या प्रोमोसोबत जोडणे, खरोखर अद्भुत आहे आणि मिथुन सरांनी या शोमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या खरोखर जादुई आहेत.”

बातम्या आणखी आहेत...