आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Mns Leade Ameya Khopkar Shivsena Mla Pratap Sarnaik Warns Bigg Boss 14 Contestant Jaan Sanu Over His Statement On Marathi Language

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14:कुमार सानूच्या मुलाने केला मराठीचा अपमान, ‘मुंबईत राहून तुझे करिअर कसे बनते तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा इशारा; शिवसेनेनेही केली शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला मराठी ऐकून चीड येते, असे जान कुमार सानू शोमध्ये म्हणाला आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसचे 14 वे पर्व सध्या सुरु आहे. नेहमीप्रमाणे यंदाही शोमध्ये वाद-विवाद सुरु झाले आहेत. सध्या राहुल वैद्य आणि गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानू आणि निक्की तंबोली यांच्यात वादंग उठले आहे. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात निक्की तंबोली हिने जानशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हणत आरडा ओरडा केला. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.

  • मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकरांनी दिला धमकीवजा इशारा

जान कुमार सानूचे हे वक्तव्य सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. या वक्तव्यामुळे समस्त मराठी प्रेक्षकांची मने दुखावली गेली आहेत. सगळ्याच मराठी प्रेक्षकांनी जान कुमार सानूवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मनसेनेही यावरून जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जानच्या या वक्तव्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करुन त्याला चांगलेच सुनावले आहे. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले, ‘जान कुमार सानू…मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी…मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला'', असे म्हटले आहे.

इतकेच नाही तर ते पुढे म्हणाले की, ''मुंबईत राहून तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केले नाही ते बरे झाले, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले'', असे ट्विट करत अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

  • शिवसेनेनेही दिला दम, आमदार प्रताप सरनाईकांनी दिला हा इशारा

जान कुमार सानूच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता शिवसेनेनेही त्याचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी जान सानूची बिग बॉस या शोमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले, ''बिग बॉस’च्या 14व्या पर्वाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागांत त्यात सहभागी असलेली स्पर्धक दुसऱ्या प्रतिस्पर्ध्या सोबत मराठी भाषेत संवाद साधत असताना अत्यंत मुजोर, मराठी द्वेष्टा जान कुमार सानू नावाच्या प्रतिस्पर्ध्याने तिला तू मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल, असे सांगत अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर, मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल'', असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.

‘बिग बॉस’ या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्रीतील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीमुळे टीआरपी मिळतो, त्याचे चित्रीकरणही महाराष्ट्रातच होते आणि त्याच महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा अवमान, त्या मालिकेतला कोणीतरी टिनपाट जान कुमार सानू नावाचा स्पर्धक करत असेल तर, ते कदापि खपवून घेणार नाही, असे प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.