आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • MNS President Amey Khopkar On Jaan Sanu's Controversial Comment On Marathi Language " Channel Has Intentionally Put Those Clips So That The Issue Is Made"

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14:जान सानूच्या मराठी भाषेच्या वक्तव्यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले - 'वाहिनीने मुद्दाम ती क्लिप ठेवली, जेणेकरुन चर्चा व्हावी'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमय खोपकर यांच्या म्हणण्यानुसार, हा एक पब्लिसिटी स्टंट होता, ज्याला आता ते जास्त महत्त्व देऊ इच्छित नाहीत.

अलीकडेच 'बिग बॉस 14' च्या घरात स्पर्धक जान कुमार सानूने मराठी भाषेचा अपमान करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यावरुन चांगलेच वादंग उठले होते. यावरुन शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली होती. मात्र, हा वाद शमत नसल्याचे बघून जानने या शोमध्ये महाराष्ट्र आणि मराठी माणसांची माफी मागितली. जानव्यतिरिक्त कलर्स वाहिनीनेही दिलगिरी व्यक्त केली. आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांच्या म्हणण्यानुसार, हा एक पब्लिसिटी स्टंट होता, ज्याला आता ते जास्त महत्त्व देऊ इच्छित नाहीत.

  • लोक महाराष्ट्रात राहून येथील भाषेचा आदर करत नाहीत

दिव्य मराठीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान अमेय खोपकर म्हणाले, "मी जे बोललो ते करुन दाखवले. जर कुणी मराठी भाषेचा अपमान केला, तर तो मी सहन करु शकत नाही. जान सानूने मराठी भाषेबद्दल केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे होते. मी वाहिनी आणि जान यांना 24 तासांत माफी मागण्यास सांगितले होते. वाहिनीने आपल्या लेटर हेडवर दिलगिरी व्यक्त केली, तर जान यानेही शोमध्ये माफी मागितली.'

'महाराष्ट्रात राहून इथल्या भाषेचा आदर न करणा-यांसाठी हा एक धडा आहे. असे बरेच लोक आहेत जे मुंबईत येतात आणि इथल्या भाषेचा अनादर करतात, जे अगदी चुकीचे आहे. जेव्हा आपण दुसर्‍या राज्यात जातो तेव्हा आपण तेथील भाषेचा आदर करतो, मग हे लोक का करू शकत नाहीत? जे लोक या पद्धतीने वागतात त्यांच्यासाठी हा एक धडा आहे. जान आणि वाहिनीने दिलगिरी व्यक्त केली नसती तर आम्ही हा कार्यक्रम प्रसारित होऊ दिला नसता", असे खोपकर म्हणाले.

  • वाहिनी ती क्लिप डिलीट करु शकली असती

अमेय खोपकर पुढे म्हणाले, "हा शो आमच्यासाठी फार महत्वाचा नाही. लोक तो पाहतात म्हणूनच तो चर्चेत राहतो. जेव्हा हा शो चालत नाही, तेव्हा वाहिनीकडून जाणूनबुजून वाद निर्माण करणारा मुद्दा उपस्थित केला जातो. आम्हाला देखील हे चांगले ठाऊक आहे. यावेळी देखील वाहिनी मराठी भाषेचा अवमान करणारी क्लिप डिलीट करु शकली असती, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यांनी मुद्दा बनावा म्हणून मुद्दाम ती क्लिप ठेवली. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात. परंतु हे सर्व माहित असूनही आम्ही आवाज उठवला, कारण येथे प्रश्न मराठी भाषेचा होता. इतर लोकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आवाज उठवला आणि आता या विषयावर आणखी काही बोलायचे नाही. या शोला आम्हाला अधिक महत्त्व द्यायचे नाही."

जानच्या या वक्तव्याबद्दल त्याचे वडील कुमार सानू यांनीही दिलगिरी व्यक्त केली. आपल्या सोशल मीडियावर कुमार सानू यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन माफी मागितली आहे. 27 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक जान कुमार सानूने स्पर्धक निक्की तांबोळीशी बोलताना मराठी भाषेची चिड येते, असे वक्तव्य केले होते.