आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता मोहित रैना मागच्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आदिती शर्मापासून तो वेगळा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. इन्स्टाग्रामवरून मोहितने लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. त्यानंतर त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या. पण आता मोहितनेच या सर्व प्रकरणावर मौन सोडेल आहे.
मोहित रैना आणि अदिती शर्माशी 1 जानेवारी 2022 रोजी लग्न केले होते. सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत मोहितने याची माहिती चाहत्यांनी दिली होती. मात्र आता पत्नीसोबतचा एक फोटो वगळता मोहितने लग्नाचे आणि लग्नानंतरचे सगळे फोटो इन्स्टाग्रामवरुन डिलिट केले आहेत. आता वैवाहिक आयुष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत मोहितने यामागचे सत्य सांगितले.
एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना मोहित रैना म्हणाला, "हा काय मूर्खपणा आहे. या सर्व अफवा निराधार आहेत. मी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे."
इतकेच नाही तर मोहितने डोंगरातील एक फोटो शेअर केला आहे. यावरून स्पष्ट होते की मोहित आणि त्याच्या पत्नीत सर्वकाही ठीक आहे. पण लग्नाचे फोटो डिलिट करण्यामागील कारण मात्र मोहितने सांगितले नाही.
मोहित रैनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो देवों के देव महादेव या मालिकेतून घराघरांत पोहोचला. त्याने विकी कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मधून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर 'शिद्दत', 'मुंबई डायरीज 26/11', 'भौकाल', 'काफिर' या चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही भूमिका साकारल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.