आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
80 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार मुकेश खन्ना आणि गजेंद्र चौहान यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. कपिल शर्माच्या शोला मुकेश खन्ना यांनी अश्लील म्हटले होते, त्यावरुन या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
कपिल शर्माच्या शोमध्ये महाभरातातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये नीतीश भारद्वाज, फिरोज खान, गजेंद्र चौहान, पुनीत इस्सर आणि गूफी पटेल यांचा समावेश आहे. पण मुकेश खन्ना यांनी शोमध्ये जाण्यास नकार देत शोवर टीका केली होती. या कार्यक्रमात पुरुष स्त्रियांचे कपडे परिधान करुन फालतू विनोद करतात, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावरुन आता गजेंद्र चौहान यांनी एका मुलाखतीमध्ये मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधला आहे.
गजेंद्र चौहान यांनी मुकेश खन्ना यांंना सुनावले
गजेंद्र यांनी म्हटले की, कपिल शर्माच्या शोमध्ये पुरुष महिलांचे कपडे परिधान करतात. पण ते हे विसरले की महाभारत मालिकेत अर्जुनाने एका मुलीचे कपडे परिधान करुन सीन दिला होता. मग त्यांनी देखील शो सोडायला हवा होता का?.
लाइमलाइटसाठी लोकांवर टीका करतात
अलीकडेच गजेंद्र यांनी आजतकला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधताना म्हटले, ‘तुम्ही महाभारतात पीएचडी केलेली नाही त्यामुळे संपूर्ण ज्ञान केवळ तुम्हालाच नाही. तुम्ही एकता कपूरच्या महाभारत मालिकेवर कमेंट केली आणि तिला वाटेल ते बोललात. तुम्ही सोनाक्षी सिन्हाच्या शिक्षणावर देखील प्रश्न उपस्थित केलात. आता तुम्ही कपिल शर्मावर निशाणा साधून लाइमलाइटमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहात,’ असे गजेंद्र म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मी जशी महाभारतात एक भूमिका साकारली होती, तशीच त्यांनीही साकारली होती. ते महाभारतापूर्वी एक फ्लॉप अभिनेते होते. त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरले म्हणून ते टीव्हीवर आले होते.
बीआर चोप्रांच्या महाभारत (1988) मध्ये भीष्म पितामह ही व्यक्तिरेखा साकारुन मुकेश खन्ना प्रसिद्धीझोतात आले होते. तर याच मालिकेत गजेंद्र चौहान यांनी युधिष्ठिरचे पात्र वठवले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.