आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Music Composer Sajid Khan Became Emotional After Remembering Wajid Khan On The Set, Said For Me My Brother Was My World

सारेगमप लिटिल चॅम्प्स:भावाच्या आठवणीने भावुक झाले साजिद, म्हणाले - 'माझ्यासाठी माझा भाऊ हेच माझं विश्व होतं!'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सेटवर भावाच्या आठवणीत झाले भावूक

संगीतकार जोडी साजिद-वाजिदपैकी साजिद खान नुकतेच सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ च्या सेटवर आले होते. येथे ते भाऊ वाजिद खान यांच्या आठवणीत भावुक झाले आणि त्यांचे अनेक किस्सेदेखील सांगितले.साजिदने सांगितले, ‘वाजिद एक खरा संगीतकार होता. तो रोज 8 तास आपल्या गिटावर रियाज करत होता. सुरुवातीला मी कुटुंबासाठी पगारावर एका चॅनलसाठी काम करत होतो. काळी काळ मी आपल्या मित्राच्या आइस्क्रमीच्या दुकानावरदेखील काम केले.

  • वाजिदवर खोटा आरोप लागला होता

शोमध्ये साजिद म्हणाले, “जेव्हा आम्हाला पहिला ब्रेक मिळाला तेव्हा वाजिदवर खोटा आरोप करण्यात आला. त्या क्षणी तो माझ्याकडे मदतीसाठी आला आणि मग मी ठरवले, त्याच्याबरोबर काम करणार. त्याचे संगीताविषयीचे प्रेम पाहून मी थक्क झालो हाेतो. फक्त अन् फक्त मी माझ्या भावासाठी त्याच्यासोबत काम करू लागलो. माझा भाऊ माझ्यासाठी सर्वकाही होता. त्याच्या यशाने मी खुश व्हायचो. वाजिदने या शोचे निर्णायक म्हणून काम पाहिले, तो याचा सल्लागार समितीतदेखील होता.

आगामी भागांमध्ये या कार्यक्रमातील अप्रतिम गायनकला लाभलेले बालस्पर्धक आपल्या बहारदार सादरीकरणाद्वारे वाजिद यांना श्रध्दांजली वाहताना दिसतील. रनिता आणि आर्यनंदा यांनी गायलेल्या ‘तेरे नैना बडे कातिल’ या गाण्याने अनेकांची मने जिंकली असली, तरी झैद अलीच्या ‘दगाबाज रे’ या दमदार गाण्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकेल.

बातम्या आणखी आहेत...