आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाइट कॅमेरा अ‍ॅक्शन:तीन महिन्यांनंतर सुरु झाले 'नागिन 4'चे चित्रीकरण, अभिनेत्री निया शर्माने दाखवली शूटिंगची झलक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निया शर्माने टीमसोबत चित्रीकरणाचा श्रीगणेशा केला.

लॉकडाऊनमुळे बंद असलेली एंटरटेन्मेंट इंडस्ट्री तीन महिन्यांनंतर आता हळूहळू पुर्वपदावर येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनंतर आता इंडस्ट्रीतील सर्व बड्या संघटनांनीही शूटिंग सुरू करण्यास संमती दिली आहे. ज्यानंतर आता एकता कपूरच्या 'नागिन 4' या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सर्व सावधगिरी बाळत निया शर्माने टीमसोबत चित्रीकरणाचा श्रीगणेशा केला.   एका मोठ्या ब्रेकनंतर सेटवर पोहोचलेली निया शर्मा यावेळी आनंदी दिसली. अलीकडेच नियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हॅनिटी व्हॅनमधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. कोरोनाविषयीची भीती व्यक्त करताना नियाने लिहिले, 'कट टू- तीन महिन्यांनंतर. सेटवर परतले आहे. माझी व्हॅनिटी. नागिन 4, जीव मुठीत घेऊन', असे कॅप्शन तिने दिले आहे. 

याशिवाय सेटवरचीही काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात निया तिचे दिग्दर्शक रंजन कुमारसोबत बातचित करताना दिसतेय. 'नागिन 4' ची संपूर्ण टीम यावेळी फेस शील्ड, मास्क आणि पीपीई किट्सचा वापर करताना दिसली. नियासमवेत या मालिकेचा मुख्य अभिनेता विजयेंद्र कुमेरियादेखील सेटवर हजर होता.

  • लवकरच नवीन सीजन सुरू होईल

लॉकडाऊनमुळे बर्‍याच टेलिव्हिजन शोजमध्ये एक लांब गॅप आला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम बंद पडल्याची चर्चा आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की, एकता कपूर लवकरच 'नागिन 4' च्या क्लायमॅक्सचे शूटिंग करुन या शोच्या नवीन सीझनला सुरुवात करणार आहे. एकताने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, सीझन 4च्या शेवटच्या भाग जिथे संपेल तेथून सीझन 5 ची सुरुवात होणार आहे. नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांना बरंच काही नवीन बघायला मिळणार आहे. नवीन सीझनसाठी नागिनच्या भूमिकेसाठी लीड अभिनेत्रीचा शोध सुरु आहे.  

बातम्या आणखी आहेत...