आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बडे अच्छे लगते हैं 2':नकुल मेहता आणि दिशा परमार स्टारर 'बडे अच्छे लगते हैं 2' चा प्रोमो बघितला का! शोबद्दल दिशा म्हणाली - प्रेक्षकांना ही मालिका बघायला खूप मजा येईल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेचा प्रोमो एकता कपूरने अलीकडेच आपल्या सोशल मीडियावरून रिलीज केला.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनी ‘बडे अच्छे लगते हैं’ ही त्यांची अत्यंत लोकप्रिय मालिका पुन्हा घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. परिपक्व प्रेमाला समर्पित असलेल्या या दुसर्‍या सीझनमध्ये तिशीत असलेल्या दोन व्यक्तींची कहाणी उलगडून दाखवली जाणार आहे, ज्या दोघांना त्यांचा विवाह झाल्यानंतर एकमेकांवर प्रेम करण्याचा मार्ग हळूहळू सापडतो. या दुसर्‍या सीझनमध्ये नकुल मेहता आणि दिशा परमार हे दोघे राम आणि प्रिया या दोन लोकप्रिय झालेल्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. मालिकेचे मुख्य कलाकार दिशा परमार आणि नकुल मेहता यांनी अलीकडेच इंडियन आयडॉल 12च्या ग्रँड फिनालेमध्ये या मालिकेचे पोस्टर रिलीज केले.

याबद्दल बोलताना प्रियाची व्यक्तिरेखा साकारत असलेली दिशा परमार म्हणाली, “माझी अशी मनापासून इच्छा की, प्रेक्षकांनी पहिल्या सीझनप्रमाणेच बडे अच्छे लगते हैं च्या या सीझनचेही प्रेमाने स्वागत करावे. या मालिकेचा एक भाग होताना मला खूप आनंद होत आहे. प्रेक्षकांना ही मालिका बघायला खूप मजा येईल, अशी मला आशा आहे.

राम कपूरने साकारलेली प्रसिद्ध भूमिका करत असलेला नकुल मेहता म्हणाला, “मी टेलिव्हिजनवरून छोटी सुट्टी घेतली होती. सर्वसाधारणपणे दोन मालिकांच्या दरम्यान मी अशी सुट्टी घेतो. या काळात तसे काहीच रोमांचक घडत नव्हते, आणि अशा वेळी हा (‘बडे अच्छे लगते हैं’ चा) प्रस्ताव आला. मी तेव्हाच स्वतःशी म्हटले, होय, मला ही भूमिका करायची आहे. ही मालिका मी पाहिली आहे. माझ्या आई-वडिलांची ती खूप आवडती मालिका होती. ते एक वेगळेच आव्हान असेल, असे मला वाटले. ही अशा प्रकारची भूमिका आहे, जी मी यापूर्वी कधीच केलेली नाही, त्यामुळे मला एकदम हुरूप आला आणि आता लवकरच मालिका लॉन्च होत आहे. मी त्याबाबत फारच रोमांचित आहे.”

बडे अच्छे लगते हैं च्या दुसर्‍या सीझनमध्ये आधुनिक काळातील प्रेमावर आणि शहरी एकाकीपणावर फोकस असेल. या मालिकेतून हे देखील दाखवले जाईल की, लग्नानंतर पती-पत्नी कसे हळूहळू प्रेमात पडू लागतात आणि मग त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर हे दोन्ही निर्माण होतो. या मालिकेचा प्रोमो एकता कपूरने अलीकडेच आपल्या सोशल मीडियावरून रिलीज केला. या जोडीला टीव्हीच्या पडद्यावर राम आणि प्रियाच्या रूपात पाहण्यास सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...