आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Names Of 20 TV Actors Revealed In Drug Dispute After Abigail And Sanam, Top Paddler Revealed That He Suplied Them Drug

टीव्ही सेलिब्रिटींचे ड्रग्ज कनेक्शनः:अबिगेल आणि सनम यांच्यानंतर ड्रग्ज प्रकरणात 20 टीव्ही कलाकारांची नावे उघड, मोठ्या ड्रग पेडलरने सांगितले कोणत्या सेलेब्सना करायचा ड्रग्ज सप्लाय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता टीव्ही इंडस्ट्रीदेखील या वादात जोडली गेली आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणानंतर इंडस्ट्रीचे ड्रग्ज प्रकरणात नाव जोडले गेले आहे. दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंग सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यासारख्या बड्या अभिनेत्रींना या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. ड्रग्ज वादाने बॉलिवूडबरोबरच आता टीव्ही इंडस्ट्रीतही शिरकाव केला आहे. बुधवारी टीव्ही अभिनेत्री अबिगेल पांडे आणि तिचा प्रियकर सनम जोहर यांची एनसीबीच्या टीमने चौकशी केली होती, त्यानंतर अन्य 20 टीव्ही सेलेब्सची नावे समोर आली आहेत.

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या ड्रग पेडलरपैकी एक असलेल्या करमजीतची चौकशी केल्यानंतर अनेक नावांचा उलगडा झाला असून यात 20 टीव्ही सेलिब्रिटींचा समावेश आहे. बॉलिवूड स्टार्सव्यतिरिक्त करमजीत या टीव्ही कलाकारांनादेखील ड्रग्ज पुरवायचा. हा मोठा खुलासा झाल्यानंतर सध्या एनसीबीने या नावांची पडताळणी करून यादी तयार केली आहे, त्यांनादेखील लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

अबिगेल आणि सनमची पुन्हा चौकशी केली जाईल

बुधवारी सुशांतची मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री अबिगेल पांडे आणि तिचा प्रियकर सनम यांना एनसीबीच्या टीमने गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले. ड्रग पेडलर्स अनुज केशवानी आणि राहिल यांच्या चौकशीत या दोन्ही कलाकारांची नावे उघडकीस आली होती, त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आहे. एनसीबीच्या पथकाने त्यांच्या जुहूच्या घरावर छापा टाकला होता. मात्र तेथून अमली पदार्थ सापडल्याचे वृत्त नाही.

या टीव्ही स्टार्सचे होते ड्रग कनेक्शन

एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत सध्या सुरू असलेल्या या वादापूर्वीदेखील ब-याच टेलिस्टार्सचे ड्रग्जशी संबंध राहिले आहेत. यात अपूर्व अग्निहोत्री आणि त्याची पत्नी शिल्पा सकलानी यांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी दोघांनाही रेव्ह पार्टीत पकडण्यात आले होते. या व्यतिरिक्त राहुल महाजन, सिद्धार्थ शुक्ला, सिद्धार्थ सागर आणि सौरभ पांडे हेदेखील ड्रग वादात अडकले होते. यापैकी बर्‍याच लोकांनी ड्रग व्यसनाधीन असल्याचे उघडपणे कबूल केले आहे, तर काहींनी या प्रकरणांवर मौन बाळगले आहे.