आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • 'Nattu Kaka' Aka Ghanshyam Nayak Merged Into Panchtatva, The Entire Team Of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' Attended The Funeral

श्रद्धांजली:पंचत्वात विलीन झाले 'नट्टू काका' उर्फ ​​घनश्याम नायक, अंत्यदर्शनाला पोहोचली 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची संपूर्ण टीम

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील 'नट्टू काका' उर्फ घनश्याम नायक यांचे रविवारी कर्करोगामुळे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज कांदिवली पश्चिम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मालिकेची संपूर्ण टीम पोहोचली होती. मालिकेचे निर्माते असित मोदी, जेठालाल, टप्पू, बबिता आणि इतर अनेक कलाकारांनी त्यांचे अंत्य दर्शन घेतले. 'नट्टू काकांना' अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या या मालिकेच्या कलाकारांचे फोटो समोर आले आहेत.

अभिनेते घनश्याम नायक यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी चाहते आणि कलाकार पोहोचले होते.
अभिनेते घनश्याम नायक यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी चाहते आणि कलाकार पोहोचले होते.
'टप्पू'ची भूमिका साकारणारे भव्य गांधी आणि राज अनादकट यांनी 'नट्टू काकां'चे अंत्यदर्शन घेतले.
'टप्पू'ची भूमिका साकारणारे भव्य गांधी आणि राज अनादकट यांनी 'नट्टू काकां'चे अंत्यदर्शन घेतले.
शोचे निर्माते असित मोदी यांच्यासोबत दिलीप जोशी .
शोचे निर्माते असित मोदी यांच्यासोबत दिलीप जोशी .
'जेठालाल' उर्फ दिलीप जोशी 'नट्टू काकां'च्या अंत्य संस्काराला उपस्थित होते.
'जेठालाल' उर्फ दिलीप जोशी 'नट्टू काकां'च्या अंत्य संस्काराला उपस्थित होते.
'भिडे' अर्थात मंदार चांदवडकरही यावेळी हजर होते.
'भिडे' अर्थात मंदार चांदवडकरही यावेळी हजर होते.
'अय्यर भाई'ची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे.
'अय्यर भाई'ची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे.
बातम्या आणखी आहेत...