आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेता घनश्याम नायक गेल्या 9 महिन्यांपासून मालिकेत दिसत नव्हते. आजारपणामुळे त्यांनी काही काळासाठी हा ब्रेक घेतला होता. काही महिन्यांपूर्वी 76 वर्षीय घनश्याम यांच्या घशाची शस्त्रक्रिया झाली ज्यामध्ये 8 गाठी बाहेर काढण्यात आल्या. जवळजवळ तीन महिन्यांच्या उपचारानंतर आता त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि आता त्यांनी या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
कामाला खूप मिस करत होतो - घनश्याम
दैनिक भास्करशी झालेल्या बातचीतमध्ये घनश्याम नायक म्हणाले, "मी 16 मार्च रोजी शेवटचे चित्रीकरण केले होते. लॉकडाउनमुळे आम्हाला शूटिंग थांबवावी लागली होती. अनलॉक झाले तरी मी शूटिंगवर जाऊ शकलो नाही. महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यावेळी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना शूट करण्याची परवानगी नव्हती. दरम्यान, मला माझ्या घशाचे ऑपरेशन करावे लागले ज्यामध्ये 8 गाठी काढण्यात आल्या. परंतु आता मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि सेटवर परतलो आहे. पुन्हा शूटिंग सुरू केल्याने मी खूप आनंदी आहे. कारण गेले नऊ महिने मी माझ्या कामाला खूप मिस करत होतो. तब्बल 9 महिन्यांनंतर (16 डिसेंबर) मला कॅमेरासमोर येताना खूप समाधान वाटत आहे. "
नट्टू काकांवर किमोथेरपी झाली होती
घनश्याम यांनी सेटवरील आपल्या पहिल्या दिवसाबद्दल सांगितले. ते म्हणाले, "असित मोदी आणि संपूर्ण टीमनी माझी खूप काळजी घेतली. मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. माझा पहिला सीन जेठालाल (दिलीप जोशी) आणि बागा (तन्मय वकारिया) यांच्यासोबत होता. दोघांनीही मला खूप कम्फर्टेबल केले. संवाद बोलताना मला काहीच अडचण वाटली नाही. नट्टू काका गाडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये परतले आहेत. 2-3 दिवसांत हा भाग प्रसारित होईल." घनश्याम नायक यांना घश्याच्या उपचारांसाठी किमोथेरपी आणि रेडिएशनची मदत घ्यावी लागली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.