आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीवरील 'कुसुम'चा वाढदिवस:आता अशी दिसते नौशीन अली सरदार, अपघातानंतर चेह-याला झाली होती दुखापत करावी लागली होती सर्जरी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही इंडस्ट्रीतील पदार्पणाच्या वेळी नौशीन केवळ 18 वर्षांची होती.

एकता कपूरच्या गाजलेल्या 'कुसुम' या टीव्ही मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री नौशीन अली सरदार हिचा आज वाढदिवस आहे. नौशीनचा जन्म 29 जून 1982 रोजी मुंबईत झाला होता. 2001 ते 2005 याकाळात टीव्हीवर प्रसारित झालेल्या कुसुम या मालिकेत नौशीनने कुसुम ही भूमिका वठवली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील पदार्पणाच्या वेळी नौशीन केवळ 18 वर्षांची होती.

2001 पासून ते आतापर्यंत गेल्या 20 वर्षांत नौशीनच्या रुपात आलेला बदल हैराण करणारा आहे. एका मुलाखतीत नौशीनने सांगितले होते की, 'ऑनस्क्रिन मी मॅच्युअर भूमिका साकारते. मात्र ऑफस्क्रिन मी अगदी अपोझिट आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी अद्याप मॅच्युअर झालेली नाही. आजही जेव्हा आयुष्यातील सत्य समजून घेण्याची वेळ येते, तेव्हा माझी मानसिकता एखाद्या लहान मुलीप्रमाणे होते. मला वाटतं, अद्याप मी मोठी झालेली नाही.'

2003 मध्ये अपघातानंतर करावी लागली होती शस्त्रक्रिया
नौशीनचा ऑनस्क्रिन बदलेला लूक बघून तिने शस्त्रक्रिया केल्याची चर्चा होती. कुठल्याही प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी केली नसल्याचा खुलासा नौशीनने केला होता.

नौशीनने सांगितले होते, 2003 मध्ये तिला एक मोठा अपघात झाला होता. त्यामुळे चालताना तिला श्वास घेणे कठीण होत होते. त्यामुळे तिच्यावर एक सर्जरी करण्यात आली होती. याच कारणामुळे तिच्या लूकमध्ये हा बदल घडून आला.

'कुसुम'च्या वेळी करिअरला गंभीरपणे घेतले नव्हते
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना नौशीनने सांगितले होते, "कुसुम या मालिकेच्या वेळी मी केवळ 18 वर्षांची होती. त्याकाळात मी करिअरला गंभीरपणे घेतले होते. सेटवर मी खूप मस्ती करायचे. मला आठवतंय, जेव्हा मी हसणे सुरु करायचे, तेव्हा बराच वेळ ते थांबवू शकत नव्हते."

बातम्या आणखी आहेत...