आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हरियाणाचे नवीन गुलिया गेल्या वर्षी 'कौन बनेगा करोडपती 11' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. व्हीलचेयरवर दिसलेल्या नवीन यांनी या शोमध्ये 12.50 लाख रुपये जिंकले होते आणि बिग बींना वचन दिले होते की, हे संपूर्ण पैसे ते गरजूंना मदत करण्यासाठी वापरतील. देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान त्यांनी आपले वचन पाळले आहे.
नवीन यांनी दिल्ली सीमेपासून चार किमी अंतरावर असलेल्या झज्जर जिल्ह्यात एक निवारा केंद्र उभारले आहे, जेथे सर्व प्रकारचे गरजू लोक राहू शकतील. येथे त्यांना खाण्यापिण्यापासून ते औषधापर्यंतच्या सुविधा निःशुल्क देण्यात येतील. विशेष बाब म्हणजे हे निवारा केंद्र उभारण्याच्या वेळी त्यांनी त्या मजुरांना कामही दिले, जे लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने पायीच आपल्या घरी रवाना झाले होते.
नवीन गुलिया यांचे स्वप्न भारतीय सैन्यात दाखल होण्याचे होते. परंतु पॅरा कमांडोच्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात एक अपघात झाला आणि त्यांनी त्यांचे पाय गमावले. असे असूनही ते समाजसेवेत मग्न आहेत. नवीन यांनी बिग बींना दिलेले वचन कसे पूर्ण केले ते वाचा त्यांच्याच शब्दांत -
'केबीसी'च्या पुढच्या सीझनपूर्वी आपले वचन पूर्ण केले
मी ‘केबीसी’मध्ये अमिताभ सरांना जे वचन दिले होते, ते पुढचा सीझन येण्यापूर्वीच पूर्ण केले. हा कार्यक्रम गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रसारित झाला होता आणि मला त्याच्या पुढच्या महिन्यात शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मी दोन महिने रुग्णालयात होतो. त्यामुळे काम सुरू होऊ शकले नाही. मग मी जेव्हा काम सुरू केले त्याचकाळात लॉकडाऊन जाहीर झाले. पण मी हे काम थांबू देणार नाही, असा निर्णय घेतला होता.
मजुरांसाठी निवारा केंद्राच्या ठिकाणीच बांधले तंबू
लॉकडाऊनमुळे जेव्हा मजुरांवर रोजीरोटीचे संकट निर्माण झाले, तेव्हा ते पायीच आपल्या घरी निघाले होते. हे बघून मी त्यांना थांबवले आणि त्यांना आपल्या निवारा केंद्राच्या कामावर लावले. सर्वांना एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी आम्ही मजुरांसाठी तिथेच तंबू उपलब्ध करून दिले होते.
तो परिसर पूर्णपणे आयसोलेटेड आहे. त्यामुळे कामगार तेथून बाहेर पडले नाहीत. त्यांच्यात विषाणू पसरला नाही आणि त्यांच्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही. तसेच या मजुरांना कामाचे पैसेही मिळाले. त्यांचेही भले झाले आणि आमचेही काम पूर्ण झाले.
15 वर्षांपासून समाजसेवेशी जुळलोय
जवळपास 40 मजूरांनी मिळून माझे स्वप्न पूर्ण केले. पहिल्या दिवसापासून मीसुद्धा तिथेचे तंबू लावून राहिलो. मी 'केबीसी' कडून 12.50 लाख रुपये जिंकले. परंतु कर वजा केल्यानंतर केवळ 8 लाख रुपये माझ्या हातात आले. निवारा केंद्र उभारण्यासाठी सुमारे 40 लाख रुपये लागले आहेत. पण 'केबीसी' मुळे बरेच लोक मदतीसाठी पुढे आले. मी 15 वर्षांपासून चांगल्या कार्याशी जुळले आहे, एवढ्या वर्षांत संसाधनांची कमतरता कधी भासली नाही.
हे निवारा केंद्र प्रत्येक गरजूंसाठी आहे
इतर बर्याच संस्थांप्रमाणेच केवळ अपंग किंवा वृद्धांनाच आमच्या निवा-यात स्थान देण्यात येईल असे नाही, येथे आम्ही सर्व प्रकारच्या गरजूंना मदत करू. आतापर्यंत बरेच पीडित माझ्याकडे आले. पण तेव्हा माझ्याजवळ त्यांच्यासाठी जागा नव्हती. आता निव-याची सोय झाल्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना येथे ठेऊ शकेल आणि त्यांना सक्षम करु शकेल, अशी आशा आहे.
'अपनी दुनिया अपना आशियाना' ही संस्था चालवतात नवीन
नवीन गुलिया 'अपनी दुनिया अपना आशियाना' नावाची संस्था चालवतात. ही संस्था दिव्यांग मुले आणि स्त्रियांसाठी काम करते. कर्म योगी या नावाने प्रसिद्ध असलेल्या नवीन यांना चालता येत नाही. असे असूनही, 2004 मध्ये, ते स्वतः तयार केलेली गाडी स्वतः चालवत दिल्लीहून जगातील सर्वोच्च मोटरसायकल पास मारसिमिकला पोहोचले होते. येथे पोहोचणारी ती पहिली व्यक्ती ठरले. यासाठी त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
18632 फूटांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गाडीत स्वतः मॉडीफिकेशन केले होते. एक्सलरेटर, ब्रेक आणि क्लचसह सर्व नियंत्रणे हातात धरुन त्यांनी 55 तास सलग ड्राइव्ह केले होते. नवीन एका बातचीतमध्ये म्हणाले होते, "अपघातानंतर जेव्हा मी 55 तास गाडी चालविली तेव्हा लोकांनी माझे यश ओळखले. पण त्या यशापूर्वी मी हजार वेळा अपयशी ठरलो होतो."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.