आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई होणार आहे नेहा कक्कर:नेहा-रोहनने दिला चाहत्यांना सुखद धक्का, बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करुन नव-याला म्हणाली -  'ख्याल रखा कर '

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने पूर्ण होत आहेत.

'इंडियन आयडॉल' या सांगीतिक कार्यक्रमाची परीक्षक आणि पार्श्वगायिका नेहा कक्कर आई होणार आहे. नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या फोटात नेहा आपले बेबी बंप दाखवत असून तिच्यासोबत रोहनही दिसतोय.

नेहाने फोटो शेअर करत “ख्याल रखा कर”, असे कॅप्शन दिले आहे. रोहननेदेखील हाच फोटो शेअर करुन त्यावर कमेंट केली आहे.

  • आता जास्त काळजी घ्यावी लागेल

रोहनने नेहाच्या फोटोवर कमेंट करताना हे दोघे लवकर आईबाबा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली आहे. तर नेहाचा भाऊ टोनी कक्करने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, 'मी मामा होणार आहे.'

  • अनेक सेलिब्रिटींनी दिल्या नेहा-रोहनला शुभेच्छा

नेहाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती अशी चर्चा रंगली आहे. अभिनेता आणि टीव्ही होस्ट जय भानूशालीने लिहिले, 'नेहा आणि रोहन खूप खूप शुभेच्छा' तर संगीतकार रोचक कोहलीने लिहिले, 'मुबारकां.'

टीव्ही अभिनेत्री कनिका मानने दोघांना खूप खूप शुभेच्छा, असे म्हटले आहे. गायिका हर्षदीप कौरनेही दोघांचे अभिनंदन केले आहे. एली अवराम, करिश्मा तन्ना आणि रिद्धिमा तिवारीसह अनेक सेलिब्रिटींनी नेहा आणि रोहन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 24 ऑक्टोबर रोजी झाले लग्न

नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. दोघांची पहिली भेट काही महिन्यांपूर्वी 'आजा चल ब्याह करवाएं, लॉकडाउन विच कत्त होने खर्च' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान झाली होती.

रोहन प्रीत सिंग 2019 मध्ये 'इंडियाज राइजिंग स्टार'च्या तिस-या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय तो 'मुझसे शादी करोगे' या रिअॅलिटी शोमध्येही झळकला होता.

बातम्या आणखी आहेत...