आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Tv
 • Neha Kakkar Speaks For The First Time On Marriage And First Meeting With Rohan Preet, Said Rohu Is The Cutest Of All The Boys I Met.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:लग्न आणि रोहन प्रीतसोबतच्या पहिल्या भेटीविषयी नेहा कक्कर म्हणाली - 'मी आतापर्यंत भेटलेल्या सर्व मुलांमध्ये रोहू सर्वात जास्त क्यूट आहे'

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आज नेहा कक्कर आणि रोहन प्रीत यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली. पंजाबी गायक रोहन प्रीतसोबत नेहाचे लग्न झाले आहे. लग्न आणि हनिमूनच्या फोटोमुळे नेहा आणि रोहन सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. आता नेहा लवकरच 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार आहे. यानिमित्ताने तिच्यासोबत झालेल्या बातचीतमध्ये तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

 • या वेळी इंडियन आयडॉल सीझन 20-20 मध्ये प्रेक्षकांना नवीन काय बघायला मिळणार आहे?

ज्यांना यापूर्वी अनेक कारणांमुळे ऑडिशन देता आले नाही, त्यांनी आता पहिल्यांदा टीव्ही रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन दिले आहे. यावेळी प्रत्येक स्पर्धक अद्वितीय आणि वेगळा आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या स्पर्धकांना ऐकता येणार आहे. हा शो कोविड 19 महामारीच्या काळात सुरू झाला, ज्यामुळे बराच त्रास सहन करावा लागला. या काळात लोकांना घरातूनच ऑडिशन देण्याची संधी या शोने दिली. हा प्रत्येकाच्या जीवनात थोडी सकारात्मकता आणण्याचा पहिला प्रयत्न होता.

टीनएजरपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने स्वत:चे व्हिडिओ अपलोड करून ऑडीशनमध्ये भाग घेतला. यावर्षी जगभरात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत संगीताच्या माध्यमातून आम्ही लोकांना आनंद देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. सध्याच्या परिस्थितीत, विशेषत: जेव्हा सगळीकडे निराशा पसरली आहे, तेव्हा हा शो आशा आणि सकारात्मकता आणेल, अशी आम्हाला आशा आहे.

 • या वेळी इंडियन आयडॉल 20-20 च्या सेटवर काय वेगळे असेल?

आम्ही सर्व खबरदारी घेतोय. यात सेटवर किमान क्रू व कर्मचारी यांच्यासह स्वच्छता व सामाजिक अंतर पाळले जात आहे. या वेळी स्टुडिओमध्ये प्रेक्षक नसतील, मात्र मी त्यांना खूप मिस करणार आहे. या वेळी सेटवर खूप शांत वातावरण असेल. परंतु या सर्व खबरदारी याकाळात किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि म्हणूनच आम्ही त्याचे पालन करत आहोत.

 • नेहा आणि रोहन प्रीतची लव्ह स्टोरी कशी आहे?

'नेह दा व्याह'च्या शूटिंग सेटवर पहिल्यांदा माझी रोहूशी भेट झाली होती. त्यावेळी तो सेटवर उपस्थित सर्वांशी खूप जास्त चांगले वागतोय, अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. तो अतिशय क्यूट आहे, हे मी नाकारु शकत नाही. मी आजवर भेटलेल्या सर्व मुलांमध्ये तो सर्वात जास्त क्यूट आहे. आणि आमच्यातील आकर्षण खूपच मजबूत होतं. तो माझ्यासाठीच आहे, हे मला समजले. त्याने मला प्रपोज केले आणि आता आमचे लग्नसुद्धा झाले आहे.

 • वैवाहिक आयुष्य आणि काम कसे मॅनेज करत आहे?

मी सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. या काळात मी विश्रांती घेत आहे. परंतु मला खात्री आहे की मी माझे काम आणि वैवाहिक जीवन यांना नक्कीच उत्कृष्टरीत्या बॅलन्स करेल.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser