आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • New Episodes Of 'Kundali Bhagya', 'Kumkum Bhagya' And Other Shows To Be Telecast From July 13, Stars Seen Wearing Masks On The Set

गुड न्यूज:13 जुलैपासून सुरु होणार 'कुंडली भाग्य', 'कुमकुम भाग्य' आणि इतर शोजचे नवीन एपिसोड, सेटवर मास्क लावून दिसले कलाकार

किरण जैन, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सर्व मालिकांचे नवीन भाग 13 जुलैपासून प्रसारित होणार आहेत.

लॉकडाऊननंतर सुमारे तीन महिन्यांनंतर टेलिव्हिजन इंडस्ट्री पुन्हा एकदा सुरु झाली आहे. बहुतेक टीव्ही निर्मात्यांनी त्यांच्या मालिकांचे शूटिंग सुरू केले आहे. झी टीव्हीवरील कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, तुझसे है राब्ता, गुड्डन तुमसे ना हो  पाएगा या मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.   या सर्व मालिकांचे नवीन भाग 13 जुलैपासून प्रसारित होणार आहेत, असे चॅनलशी संबंधित सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर मनीष पॉल होस्ट करत असलेला सिंगिंग रिएलिटी शो 'सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स'चे नवीन भाग 18 जुलैपासून प्रसारित केले जातील.

  • लॉकडाऊनमुळे माझी विचारसरणी खूप बदलली: रीम शेख

दैनिक भास्करशी संवाद साधताना 'तुझसे है राब्ता' फेम अभिनेत्री रीम शेख म्हणाली, 'या लॉकडाउनने मला खूप काही शिकवले, मला माझ्या आईचे महत्त्व शिकवले. माझे तिच्यावर प्रेम नाही असे नाहीये, परंतु माझ्या बिझी शेड्यूलमुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष देऊ शकले नाही. आईबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही. पण या लॉकडाऊनमध्ये मी तिच्याबरोबर बराच वेळ घालवला. तसेच, जीवनात नातेसंबंधआणि कुटुंबातील सदस्यांचे महत्त्व देखील समजले. या लॉकडाऊनमुळे माझी विचारसरणीही खूप बदलली.'

  •  माझे शूटिंग आणि शोच्या सदस्यांनाही खूप मिस केले

शूटिंग सुरू होण्याबाबत रीम म्हणाली, 'यादरम्यान मी माझे शूटिंग आणि शोमधील सदस्यांनादेखील खूप मिस केले. तेसुद्धा माझ्या कुटुंबासारखे आहेत. सेटवर परत आल्यावर आता मी खूप आनंदी आहे. एक नवीन रंजक कॉन्सेप्ट प्रेक्षक लवकरच आमच्या कथेत बघू शकतील. लोकांना ते आवडेल अशी आशा आहे.'

  • 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य'च्या लीड कलाकारांनी शूट केला प्रोमो 

मालिकांच्या सेटवरुन समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य' या मालिकांमधील मुख्य कलाकार शब्बीर अहलुवालिया, श्रीती झा, श्रद्धा आर्य आणि धीरज धुपर यांनी एकत्र प्रोमो शूट केला.