आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुड न्यूज:13 जुलैपासून प्रग्या, प्रीता, गुड्‌डन आणि कल्याणी येणार आहेत प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या यापुढे काय असेल मालिकांची स्टोरी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 जुलैपासून सा रे ग म प लिटल चॅम्प्स पाहायला मिळणार आहे.

आता लॉकडाऊन हळूहळू उठत चालला असून देशभरातील लोक नवीन सामान्य आयुष्यात प्रवेश करत आहेत आणि सरकारच्या मार्गदर्शनानुसार वाहिनीसुद्धा चित्रीकरणाच्या सुरूवातीची तयारी करत असून आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवीन भाग घेऊन घेऊन येण्यासाठी सज्ज होत आहे. 13 जुलैपासून प्रग्या, प्रीता, गुड्‌डन आणि कल्याणी यांच्या प्रवासासोबत नव्या एपिसोड्‌ससह पुन्हा जोडण्यासाठी झी टीव्ही आपल्या प्रेक्षकांना निमंत्रण देत आहे. 

झी टीव्हीवरील मोठ्‌या प्रमाणावर पाहिला जाणारा नॉन–फिक्शन फ्रॅंचाईज शो सा रे ग म प लिटल चॅम्प्सने झैद, साई, सक्षम, आर्यानंदा आणि माधव अशा एक से एक कलाकारांसह यांच्यासह प्रेक्षकांसोबत बळकट नाते निर्माण केले. त्याचसोबत सूत्रधार मनिष पॉल आणि परीक्षकांमधील हलकेफुलके नातेसुद्धा नव्या एपिसोड्‌ससह 18 जुलैपासून पाहायला मिळणार आहे.

लॉकडाऊनच्या आधी जे काही कथानक सुरू होते त्याला पुढे नेत झी टीव्हीवरील लोकप्रिय प्राईमटाईम मालिका – कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, तुझसे है राबता आणि गुड्‌डन तुमसे ना हो पायेगा ह्या आपल्या प्रमुख कलाकारांसोबत नवीन एपिसोड्‌समध्ये नाट्‌यमय वळणांसोबत परततील. 

कुमकुम भाग्यच्या सेटवर मास्क घालून दिसले कलाकार
कुमकुम भाग्यच्या सेटवर मास्क घालून दिसले कलाकार

'कुमकुम भाग्य'मध्ये काय चालू आहे याबद्दल अभिनेत्री सृती झा म्हणाली, “आता आम्ही लवकरच चित्रीकरण करायला सुरूवात करणार आहोत आणि त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. प्राची आणि रणबीर यांची कथा आता एका मोठ्‌या वळणावर आहे. त्यांच्यातील अबोला ह्या दोघांना विलग करेल तर एकमेकांवरील प्रेमाची कबुली त्यांच्यातील नव्या प्रणयाची सुरूवात असू शकेल. ह्या नाट्‌यमय वळणाच्या चित्रीकरणासाठी आम्ही तयारी करत आहोत आणि माझ्या कुमकुम भाग्य परिवारासोबत सेटवर परतण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आगामी ट्रॅक अतिशय रोचक ठरणार असून मला आशा आहे की प्रेक्षकांना तो मनोरंजक वाटेल.”

कुंडली भाग्यच्या सेटवर श्रद्धा आर्या
कुंडली भाग्यच्या सेटवर श्रद्धा आर्या

'कुंडली भाग्य'च्या नवीन एपिसोड्‌समध्ये करणसाठीच्या आपल्या प्रेमाची नियती शोधली जाण्याबद्दल श्रद्धा आर्या ऊर्फ प्रीता म्हणाली, “करणच्या बाबतीत प्रीताला कळत नाहीये की तिने तिच्या मनाचे ऐकावे की बुद्धीचे. नव्या एपिसोड्‌समध्ये अधिक खंबीर प्रीता त्यांच्या नात्यामध्ये समस्या निर्माण करण्यासाठी वाईट बुद्धीने काही लोकांनी निर्माण केलेली कटकारस्थाने करणसमोर उघड करेल आपल्या प्रेमाला वाचवण्यासाठी शेरलिनचे सत्य ती कसे आणि केव्हा उघड करेल हे आम्ही अजून चित्रीत केले नाहीये. पण मला खात्री आहे की प्रेक्षकांना कुंडली भाग्यचे नवीन एपिसोड्‌स निश्चितपणे अतिशय रोचक वाटतील.” 

'तुझसे है राबता'मध्ये कल्याणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रीम शेख म्हणाली, “कल्याणी आणि मल्हारच्या आयुष्यातील नवीन घडामोडींचे चित्रीकरण करण्यासाठी मी खूपच उत्साहात आहे. ते दोघेही प्रेमात असले तरी त्यांच्या पालकत्वाच्या पद्धती वेगळ्‌या आहेत. त्यांना त्यांचा मुलगा श्लोकसाठी बोन मॅरो हवा असला तरी तो मिळवण्याच्या त्यांच्या पद्धती वेगळ्‌या आहेत. पुढील कथानक रोचक आहे आणि प्रेक्षकांना अनेक धक्कादायक सत्ये पाहायला मिळतील.”

'गुड्‌डन तुमसे ना हो पायेगा'मध्ये गुड्‌डनची भूमिका साकारणारी कनिका मान म्हणाली, “सेटवर परतताना मी अतिशय उत्साहात आहे आणि मला जुन्या दिवसांची आठवण येत आहे. हा शो माझ्या आयुष्यातील मोठा मैलाचा दगड ठरला आहे. यातील कथानकाने प्रेक्षकांना कायम गुंगवून ठेवले आणि आता नवीन एपिसोड्‌समधील आणखी रोचक नाट्‌यमय वळणे पाहायला मिळतील.”

  • कथा आत्तापर्यंतची आणि पुढे

लॉकडाऊनच्या आधी कुमकुम भाग्यमध्ये रणबीरने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर प्राची त्याच्यापासून लांब राहू लागली. त्याचे लग्न मायाशी ठरले आहे. पण मॉलमध्ये रणबीर आणि प्राची यांची केमिस्ट्री त्याची आजी दलजीत आणि आई पल्लवी पाहतात, काय त्या मायासोबतची त्याची एंगेजमेंट वेळेत थांबवतील?

कुंडली भाग्य
लॉकडाऊनच्या आधील प्रेक्षकांनी करण आणि प्रीता यांच्यातील प्रणयी क्षण पाहिले. पण त्यांचा तो आनंद अल्पायुषी होता कारण करणचे वडिल महेश हे बरे होण्याची लक्षणे दाखवत असतानाच त्यांना पुन्हा एकदा कोमामध्ये ढकलण्याचा आरोप शेरलिन प्रीतावर करते. त्यामुळे चिडलेला करण माहिराशी लग्न करायला तयार होतो तर प्रीताला समीरच्या मदतीने शेरलिनच्या कटाची माहिती मिळते. काय प्रीता आपली निरागसता आणि शेरलिनचे कट सिद्ध करू शकेल? 

तुझसे है राबता
कल्याणीच्या आयुष्यामध्ये उलथापालथ झाली आहे कारण आपला मुलगा मोक्षचे आयुष्य वाचवण्यासाठी बोन मॅरो ट्रांसप्लांट मिळवण्यासाठी ती डॅशिंग त्रिलोक मराठेची त्याच्या घरी राहायला येण्याची ऑफर स्वीकारते. त्रिलोकच्या मुलीला तिला सांभाळायचे असते कारण तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिचा आवाज गेलेला असतो. त्रिलोकच्या भव्य घरात प्रवेश केल्याकेल्या तिला काहीतरी नकारात्मक भावना येते. त्या घराच्या भिंतींमध्ये काहीतरी काळे गुपित दडल्याचे तिला जाणवते. त्रिलोकच्या पत्नीचा फोटो तिला हारासह दिसतो आणि ती तिच्याचसारखी दिसत असल्यामुळे कल्याणीला धक्काच बसतो. त्रिलोकच्या भूतकाळात काय आहे? तो मल्हार आणि कल्याणीपासून काय लपवत आहे आणि त्याचे खरे उद्दिष्ट्‌य काय आहे? 

गुड्‌डन तुमसे ना हो पायेगा
लॉकडाऊनच्या आधी प्रेक्षकांनी पाहिले होते की गुड्‌डनची मोठी चाहती असलेल्या गंगाने ती सगळ्‌यात मोठी चाहती असल्याचे सिद्ध करण्यासाठी कशी स्पर्धा आयोजित केली होती, तर गुड्‌डनने केलेल्या अपमानानंतर सरस्वतीने सूड घेण्यासाठी योजना बनवली. काय गुड्‌डन सरस्वतीच्या ह्या जाळ्‌यातून स्वतः ला वाचवू शकेल?  

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser