आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Newly Wed Neha Kakkar To Resume Shooting Of Indian Idol 2020 After Return From Dubai Honeymoon, Show To Be On Air From November 28

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅक टू वर्क:हनीमूनहून परत आल्यानंतर इंडियन आयडल 2020 चे शूटिंग सुरु करणार नववधू नेहा कक्कर, 28 नोव्हेंबरपासून ऑन एअर होणार शो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 29 नोव्हेंबरपासून शो होणार ऑन एअर

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर 24 ऑक्टोबर रोजी राइजिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंगसोबत विवाहबद्ध झाली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सध्या हे दोघेही दुबईत आपला लक्झरी हनिमून साजरा करत आहेत. येथून हे दोघेही आपली रोमँटिक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हनीमूनहून परतल्यानंतर नेहा आगामी इंडियन आयडॉल 2020 चे शूटिंग सुरू करणार आहे.

इंडियन आयडॉलचा नवा सीझन लवकरच सोनी टीव्हीवर सुरु होणार आहे. शोची ऑडिशन प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण झाली आहे. या सीझनमध्ये नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत.

29 नोव्हेंबरपासून शो होणार ऑन एअर
29 नोव्हेंबरपासून हा शो सोनी टीव्हीवर ऑन एअर होणार आहे, याचे शूटिंग लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. शोचे अनेक प्रोमोदेखील सोनी टीव्हीने रिलीज केले आहेत, ज्यात काही स्पर्धकांची ओळख करुन देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अंजली आणि आशिष, राजस्थानमधील सवाई, उत्तराखंडमधील शानमुख प्रिया आणि पवनदीप आणि आंध्र प्रदेशातील सिरीशा यांचा समावेश आहे. यावेळी शोची टॅगलाइन ''फिर बदलेगा देश का मौसम'' ही आहे.

बातम्या आणखी आहेत...