आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Nia Sharma Apologizes To Devoleena Bhattacharjee, Says My Mother, Brother And Ravi Lovingly Explained To Me That I Was Not Right

पर्ल व्ही पुरी प्रकरणावरुन झालेले भांडण मिटले:नियाने मागितली देवोलिनाची माफी, म्हणाली - माझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांनी मला माझ्या चुकीची जाणिव करुन दिली

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवोलिनाने नियाला केले माफ

टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरी बलात्कार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्लच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. मात्र देवोलिना भट्टाचार्जी हिने मात्र या संपूर्ण प्रकरणावरून संताप व्यक्त केला होता. तिने पर्लचे समर्थन करणा-या सेलिब्रिटींवर टीका केली होती. यावरुन निया शर्माने पर्लची बाजू घेत देवोलिनावर निशाणा साधला होता.या दोघींमध्ये बरीच शाब्दिक चकमक रंगली होती. पण आता नियाने देवोलिनाची माफी मागितली आहे.

नियाने सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तिने देवोलिनाची माफी मागितली आहे. ‘माझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांनी मला माझ्या चुकीची जाणिव करुन दिली. त्या तिघांच्या मताचा मी आदर करत देवोलिना तुझी माफी मागते. तेव्हा मला प्रचंड राग आला होता. मला आशा आहे की तू नक्की मला माफ करशील’ असे नियाने देवोलिनाची माफी मागताना म्हटले आहे.

देवोलिनाने नियाला केले माफ
देवोलिनाने नियाच्या या पोस्टवर लगेच उत्तर दिले आहे. ‘माझ्याकडूनही काही चूक झाली असेल तर माफ कर. तुझी आई, भाऊ आणि मित्र रवी यांचे मनापासून आभार, सुरक्षित रहा आणि घरात रहा’ असे देवोलिनाने म्हटले आहे.

निया-देवोलिना यांच्या वादाचे काय होते कारण?

देवोलिनाने पर्लची बाजू घेणाऱ्या कलाकारांना सुनावले होते. या कलाकारांच्या यादीमध्ये निया शर्मा देखील होती. पण नियाने लगेच देवोलिनाची खिल्ली उडवत एक सोशल मीडिया पोस्ट टाकली होती. नियाने लिहिले होते, ‘दीदीला कोणी तरी जाऊन सांगा आता कँडल मार्च करु शकत नाही. कारण कोरोना माहामारी आहे. तसेच ते विचित्र डान्स रिल्स बनवण्यापूर्वी सराव करण्याची अत्यंत गरज आहे.’ त्यानंतर देवोलिना देखील शांत बसली नाही तिने नियाला फोटोशूट्सवर लक्ष द्यायला सांगत सुनावले होते.

बातम्या आणखी आहेत...