आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Nisha Rawal Is The First Confirmed Contestant Of Kangana Ranaut's Lock Up, The Actress Has An Old Relationship With The Controversy

लॉक अप:निशा रावल आहे कंगना रनोटच्या शोची पहिली कंफर्म कंटेस्टंट; निशाचे वादाशी आहे जुने नाते, नव-यावर लावला होता कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निशा या शोसाठी आहे एक्साइटेड

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या 'लॉक अप' या वादग्रस्त शोचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या शोच्या नवीन प्रोमोत टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री निशा रावल तुरुंगातील पहिली कैदी असल्याचे दिसत आहे. यासोबतच निशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोमो व्हिडिओ शेअर करून ती शोची पहिली स्पर्धक असल्याची पुष्टी केली आहे. हा शो 27 फेब्रुवारीपासून ऑन एअर होणार आहे.

निशा या शोसाठी आहे एक्साइटेड
निशाने शोचा प्रोमो शेअर करत लिहिले, "बस्स झाला डेली सोपचा ड्रामा, आता माझ्या आयुष्यातील ख-या खेळाला होईल सुरुवात." दुसरीकडे, निशाने अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, "या नवीन आणि आव्हानात्मक प्रवासासाठी मी खूप उत्साहित आहे. असा शो यापूर्वी कधीही पाहिला नाही किंवा ऐकला नाही. हा शो भारतीय ओटीटी इंडस्ट्रीत एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल. प्रेक्षकांसाठी या व्हिज्युअल ट्रीटचा एक भाग होण्यासाठी मी एक्साइटेड आहे. "

शोमधील सर्व 16 सेलिब्रिटी स्पर्धकांना तुरुंगात टाकले जाईल
शोशी संबंधित सूत्रांनी खुलासा केला की, एकता कपूरने तिच्या प्रोग्रामिंग टीमला फक्त आणि फक्त अशा लोकांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याला वादाची किनार आहे. त्यांनी शोमध्येही बरेच वाद निर्माण करावेत आणि OTT प्लॅटफॉर्मच्या जगात खळबळ उडवून द्यावी, अशी एकताची इच्छा आहे. आतापर्यंत, मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे, लेखक चेतन भगत, यूट्युबर हर्ष बेनिवाल, सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी, टीव्ही अभिनेता कुशल टंडन, पर्ल व्ही पुरी या सेलिब्रिटींसोबत निर्मात्यांनी संपर्क साधला होता. आता यात कोण कोण स्पर्धक आहेत हे येत्या काळात कळेलच.

निशा गेल्या वर्षी वादात अडकली होती
निशाबद्दल सांगायचे तर, गेल्या वर्षी तिने पती करण मेहरावर अनेक गंभीर आरोप केले होते. निशाने करणविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची पोलिस तक्रारही दाखल केली होती. त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचाही आरोप तिने केला होता. करणने मात्र तिचे हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

बातम्या आणखी आहेत...