आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Nisha Rawal Shared Shocking Details Of Her Troubled Marriage With Karan Mehra Revealed He Has Extra Marital Affair

ये रिश्ता क्या कहलाता है:करण मेहराचे विवाहबाह्य संबंध, वाद एवढा विकोपाला गेला की पत्नीचे डोके फोडले; पत्नी म्हणाली -  करणच्या प्रतिष्ठेसाठी मी अनेक वर्ष गप्प होते

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निशा रावल आणि करण मेहरा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. निशा रावलने घटस्फोटाची मागणी केली आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा निशाने केला आहे. इतकेच नाही तर करणने आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही तिने केला आहे. निशा रावलने सोमवारी गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर करणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सोमवारी रात्रा अटकही करण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मंजुर झाला. करण मेहरा गेल्या काही दिवसांपासून शूटिंगच्या निमित्ताने पंजाबमध्ये होता.

पोलिसांत तक्रार दिल्यानंतर निशा माध्यमांसमोर आली होती. यावेळी तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी निशा पत्रकारांना म्हणाली, 'तुम्हा सर्वांसमोर अशा पद्धतीने येणे अतिशय लज्जास्पद आहे, आपण कायम रेड कार्पेट इव्हेंटवर भेटत आलो आहोत. मी फक्त कविश (निशा-करणचा मुलगा) मुळे तुमच्यासमोर आले आहे. मी आणि करण मागील 14 वर्षांपासून एकत्र आहोत. या वर्षांत बरेच काही झाले पण कोणालाही कळले नाही. करणच्या प्रतिष्ठेसाठी मी अनेक वर्ष या अत्याचारांबद्दल बोलले नाही. एखाद्या अभिनेत्यासाठी त्याची कारकीर्द आणि प्रतिमा अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि म्हणूनच मी गप्प बसले,' असे निशा म्हणाली.

निशा म्हणाली की, करणने स्वतः विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली आहे
करणवर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नीशा रावलने केला आहे. पती करण मेहराच्या फोनवर काही मसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचे ती म्हणाली आहे. निशाने सांगितले की, 'करणचे दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध आहेत, याबद्दल मला काहीच माहित नव्हते. मात्र नंतर जेव्हा मला याबद्दल समजले, तेव्हा मी करणला याबद्दल विचारणा केली आणि त्यानेही त्याच्या आयुष्यात एक मुलगी असल्याचे स्वीकारले.' इतकेच नाही तर त्या मुलीशी शारीरिक संबंध असल्याची कबुली करणने दिल्याचे निशाने यावेळी सांगितले.

निशाने सांगितले की, ही मुलगी दिल्लीची आहे आणि करण जेव्हा कुटूंबापासून दूर चंदीगडमध्ये टीव्ही शोसाठी शूटिंग करत होते तेव्हा हे त्याचे प्रेम प्रकरण सुरू झाले. कुटुंब आणि मित्र परिवारापासून आपण या सर्व गोष्टी लपवल्या. पण लग्न टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे निशा म्हणाली.

करण आणि निशा यांची 2008 मध्ये 'हंसते-हंसते' चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट झाली होती. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंचत 2012मध्ये दोघांनी लग्न केले. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव कविश आहे.

बातम्या आणखी आहेत...