आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'इंडियाज बेस्ट डान्सर' या डान्स रिअॅलिटी शोच्या मागील सीझनमध्ये प्रेक्षकांना नोरा फतेहीची झलक बघायला मिळाली होती. नोरा बॉलिवूडच्या परफेक्ट डान्सरपैकी एक आहे आणि ती तिने मागील सीझनमध्ये काही आठवड्यांसाठी मलायका अरोराची जागा घेतली होती. मलायकाचा कोविड 19चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे नोरा काही दिवसांसाठी तिच्याऐवजी या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत दिसली होती. नोराची लोकप्रियता बघता निर्मात्यांनी आता तिला पुढील सीझनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणादरम्यान निर्माते रणजित शर्मा यांनी याची पुष्टी केली. रणजित म्हणाले, "शोच्या पुढील सीझनची तयारी सुरू झाली आहे. सध्या तयारी अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि जर सर्व काही जुळून आले तर पुढच्या वर्षी आम्ही नवीन सीझन लाँच करू. देशभरातून टॅलेंटचा शोध घेतला जातोय. शोच्या फॉर्मेटमध्ये फारसा बदल होणार नाही आणि गेल्या सीझनमध्ये असलेले परीक्षकच यावेळी देखील असतील. या सीझनमध्ये आम्ही नोरा फतेही यांना परीक्षक म्हणून आणण्याचा विचार करत आहोत. नोराने या कार्यक्रमाचा खूप आनंद लुटला होता. लोकांनाही ती आवडली होती. त्यामुळे पुढच्या सीझनमध्ये प्रेक्षक नोराला जज म्हणून पाहतील."
मलायका अरोरा व्यतिरिक्त नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि गीता कपूर हा शो जज करत होते. हरियाणाचा अजय सिंहने यंदाच्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला असून सध्या त्याच्या डान्सची आणि त्याला मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्स’चं विजेतेपद पटकावणाऱ्या अजयला 15 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. तर त्याला मार्गदर्शन करणारी नृत्यदिग्दर्शिका वर्तिका झा हिला 5 लाख रुपये देण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.