आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Omung Kumar And His Wife Vanitha Omung Kumar Have Designed The Look Of The House, This Time The House Will Be Like This, See First Look

बिग बॉस OTT:ओमंग कुमार आणि त्यांच्या पत्नी वनिता यांनी कार्निव्हल लूकमध्ये डिझाइन केले ‘बिग बॉस’चे घर, बघा फर्स्ट लूक

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘बिग बॉस ओटीटी’ 8 ऑगस्टपासून डिजिटल प्लॅटफार्मवर दाखवले जाईल. करण जोहर या शोचा होस्ट असेल.

लोकप्रिय वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ची दरवर्षीप्रमाणे पुन्हा रचना करण्यात आली आहे. कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता यांनी संपूर्ण घराचे डिझाइन केले आहे. त्यांनी घर
रंगीबेरंगी आणि अनेक प्रिंट्स आणि फितींनी सजवले आहे.
यंदा घरासाठी हटके थीम

  • लिव्हिंग रूम आणि गार्डनमध्ये स्लायडिंग डोरचा वापर केला आहे, दरवाजे उघडल्यानंतर ते आणखीच सुंदर दिसेल.
  • बंक बेड म्हणजे या बाजेचा वापर केला आहे. यात आरामदायक असतात. बेडरूमलादेखील कार्निव्हल लूक दिला आहे.
  • स्वयंपाकघर कलरफुल ठेवले आहे तर स्नानगृहाचा रंग मंडपासारखा केला आहे.
  • भिंतीवर बाबू आणि फुलांच्या डिझाइन काढल्या आहेत.

याबद्दल ओमंग याबद्दल सांगतात, 'आमचे मुख्य लक्ष घराला जिप्सी आणि कार्निव्हल लूक देण्याचे होते. आम्ही या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहोत. लोकांना नक्कीच हा बदल आवडेल.’

बिग बॉस ओटीटी घरासाठी कार्निवल लूकचा पर्याय निवडला गेला आहे
ओमंग याबद्दल सांगतात, "या सीझनमध्ये मुख्य प्रस्ताव हा ओव्हर द टॉप तत्व जिवंत ठेवण्याचा होता. आम्ही बिग बॉस ओटीटी हाऊससाठी बोहेमियन, जिप्सी, कार्निवल लुक निवडला आहे. तसेच, जेव्हा
स्पर्धक येथे पोहोचतील तेव्हा त्यांना असे वाटायला हवे की, त्यांना बराच काळ येथे राहावे लागेल हा हेतूदेखील आम्हाला साध्य करायचा आहे."

घरात बंक बेडचाही वापर केला गेला आहे

बिग बॉसच्या घरात एक मनोरंजक पैलू म्हणजे आम्ही पहिल्यांदा लिव्हिंग रूम आणि गार्डन दरम्यान स्लायडिंग दारांचा वापर केला आहे, ज्यामुळे दरवाजे उघडल्यावर घर भव्य दिसते. तसेच बंक बेड (बाज) देखील वापरण्यात आले आहेत. ओमंग याबद्दल सांगतात, "बंक बेड हे खूप आरामदायक असतात जसे की तुम्ही तंबूमध्ये तळ ठोकता तेव्हा तुम्ही टेंट बेड शेअर करता. बेडरूममध्येही कार्निवल लुक देण्यात आला आहे. "

घरातही एक मोठा डोळा, जेथून करण जोहर स्पर्धकांना पाहू शकेल

ओमंग पुढे म्हणतात, "तसेच, स्वयंपाकघरालाही कलरफूल ठेवण्यात आले आहे, बाथरूम तंबूसारखे दिसते, तर भिंती बांबू आणि फुलांच्या प्रिंटमध्ये रंगवल्या आहेत. लिव्हिंग रूममध्ये मध्यभागी एक मोठा डोळा आहे. तेथून करण जोहर स्पर्धकांना पाहू शकेल. घरात अनेक कोपरे आहेत, जिथे दोन-तीन स्पर्धक कधीही एकत्र हँग आउट करू शकतात.'

बातम्या आणखी आहेत...