आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरे घर आई एक नन्ही परी...:‘पवित्र रिश्ता 2.0’ फेम अभिनेता शाहीर शेख झाला बाबा, पत्नी रुचिकाने दिला गोंडस मुलीला जन्म

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शाहीर शेख बाबा झाला आहे. त्याची पत्नी रुचिका कपूरने 10 सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. नव्या पाहुणीच्या आगमनानंतर चाहत्यांनी शाहीर आणि रुचिका यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रुचिका आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.

काही आठवड्यांपूर्वीच रुचिकाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पाडला होता आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. शाहीर किंवा रुचिका यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मागील वर्षी झाले लग्न
शाहीर आणि रुचिकाच्या लग्नाच्या बातम्या गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये समोर आल्या होत्या. दोघांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. लग्नानंतर जोडपे अभिनेत्याच्या पालकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जम्मूला पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी मुंबईत छोटे रिसेप्शनही ठेवले होते.

शाहीर शेख आणि रुचिकाची भेट दोन वर्षांपूर्वी 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांनी दीड वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शाहीरने साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली होती. रुचिकाविषयी सांगायचे म्हणजे तिने राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या', 'जबरिया जोडी', 'डॉली किट्टी और वो चमके सितारे' आणि 'ड्रीम गर्ल' मध्ये देखील काम केले आहे. रुचिका एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सची डिव्हिजन हेड आहे.

शाहीर ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘महाभारत’ आणि ‘ये रिश्ते है प्यार के’ सारख्या शोमध्ये दिसला आहे. सध्या शाहीर 'पवित्र रिश्ता 2.0' या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तो दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारलेली मानव ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्यासह अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...