आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:'पवित्र रिश्ता' फेम करण मेहरा गर्लफ्रेंड निधी सेठसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत, 'या' दिवशी दुस-यांदा चढणार बोहल्यावर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 24 जानेवारी रोजी करण आणि निधी लग्न करत आहेत.

सध्या बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीसह टीव्ही इंडस्ट्रीतही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. लवकरच अभिनेता वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाहबद्ध होणार आहे. तर टीव्ही इंडस्ट्रीतूनही अशीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा गर्लफ्रेंड निधी सेठसोबत लग्न थाटतोय. विशेष म्हणजे वरुण आणि नताशाप्रमाणेच निधी आणि करण यांनीही लग्नासाठी 24 जानेवारीचा मुहूर्त निवडला आहे.

येत्या 24 जानेवारीला वरुण धवन आणि नताशा दलाल अलीबागमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच दिवशी करण मेहरा आणि निधी सेठही आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. कोरोना साथीच्या संसर्गामुळे आपला विवाह समारंभ अगदी थाटामाटात न करता गुरुद्वारामध्ये करण्याचा निर्णय करण आणि निधीने घेतला आहे. दिल्लीत हे दोघे लग्न करणार आहेत. लग्नाच्या दिवशीच संध्याकाळी करण-निधीचे वेडिंग रिसेप्शन होणार आहे.

कोरोनामुळे लग्नाला फक्त 30 लोकांना निमंत्रण
एका मुलाखतीत करणने सांगितले, 'आम्ही लग्नाला केवळ 30 लोकांना निमंत्रण दिलंय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्यामुळे ते पाळणे महत्त्वाचे आहे. लग्नामध्ये ज्यांना सामिल होता येणार नाही त्या जवळच्या मित्रांसाठी आम्ही मुंबईत रिसेप्शन ठेवण्याचा प्लॅन करतोय. 2020 या वर्षाला आम्ही आयुष्यातून दूर ठेवणार आहोत. म्हणूनच 2021 च्या सुरुवातीलाच आम्ही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.'

करण मेहराचे हे दुसरे लग्न
करण मेहराने 2009 साली त्याची बालमैत्रीण देविकाबरोबर लग्न केले होते. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. निधीच्या रुपात करणला पुन्हा एकदा प्रेम गवसले. एका जाहिरातीच्या शुटींगच्या निमित्ताने करण आणि निधीची भेट झाली होती. या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि आता हे दोघे लवकरच साता जन्माचे सोबती होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...