आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Pavitra Rista 2 Promo: Ankita Lokhande Shared The Promo Of Pavitra Rishta 2, Fans Remembered Sushant Singh Rajput After Seeing Shaheer Sheikh As Manav

'पवित्र रिश्ता 2' प्रोमो:अंकिता लोखंडेने शेअर केला 'पवित्र रिश्ता 2' चा प्रोमो, मानवच्या भूमिकेत शाहीर शेखला बघून चाहत्यांना झाले सुशांत सिंह राजपूतचे स्मरण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रोमो पाहून चाहत्यांना सुशांत सिंह राजपूतची आठवण झाली आहे.

2009 मध्ये सुरु होऊन 2014 मध्ये ऑफ एअर झालेल्या पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेचे दुसरे पर्व पवित्र रिश्ता 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पहिल्या पर्वात अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत या जोडीने अर्चना आणि मानवची भूमिका साकारली होती. तर या सीझनमध्ये शाहीर शेखने दिवंगत अभिनेत्याची जागा घेतली आहे. लवकरच झी 5 वर प्रसारित होणाऱ्या शोचा पहिला प्रोमो देखील रिलीज करण्यात आला आहे. प्रोमो पाहून चाहत्यांना सुशांत सिंह राजपूतची आठवण झाली आहे.

अंकिता लोखंडेने नुकताच 'पवित्र रिश्ता 2'चा पहिला प्रोमो सोशल मीडियावर रिलीज केला, ज्यात तिचा आणि शाहीर शेखचा सुंदर प्रवास दाखवण्यात आला आहे. हे शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, 'मानव आणि अर्चना असताना, प्रेम वृद्धिंगत होईलच... त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात सामील व्हा...लवकरच झी 5 वर.'

या शोमधील शाहीर शेखचा लूक पूर्णपणे मागील सीझनमधील मानव उर्फ ​​सुशांत सिंह राजपूत सारखा ठेवण्यात आला आहे. शाहिरला बघून सुशांतच्या चाहत्यांन त्याचे स्मरण झाले आहे. एका यूझरने लिहिले, सुशांत सिंह राजपूतपेक्षा चांगले मानवचे पात्र कोणीही वठवू शकत नाही. आणखी एका यूजरने लिहिले, प्रत्येक सीनमध्ये सुशांतच आहे. अर्चनासोबत इतर कुणालाही बघू शकत नाही.

प्रोमोच्या काही तासांपूर्वी एकता कपूरने गेल्या सीझनची झलक शेअर केली होती. मालिका नेमकी कधी सुरु होतेय, याची घोषणा अद्याप निर्मात्यांनी केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...