आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या तुरुंगातच राहणार अभिनेता:अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पर्ल व्ही पुरीचा जामीन अर्ज दुस-यांदा फेटाळला, पुढील सुनावणी 15 जूनला

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोप - व्हॅनिटी व्हॅनमधील बलात्कार केला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता पर्ल व्ही. पुरीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. पॉक्सो कायद्याच्या कलमान्वये 4 जून रोजी वालिव पोलिसांनी पर्लला अटक केली होती. यापूर्वी पर्लने 5 जून रोजी वसई कोर्टात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. अभिनेत्याने पुन्हा कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली आणि यावेळीसुद्धा त्याच्या पदरी निराशा पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 15 जून रोजी होईल.

आरोप - व्हॅनिटी व्हॅनमधील बलात्कार केला
पीडत मुलगी तिच्या आईसोबत मालिकेच्या सेटवर येत असे. पीडितेच्या आईने पर्लसोबत एका मालिकेत एकत्र काम केले होते. त्यावेळी सेटवर आलेल्या या मुलीवर 31 वर्षीय पर्ल व्ही पुरीने व्हेनिटी व्हॅनमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या वडिलांच्या एफआयआरनंतर पर्लला अटक करण्यात आली आहे. तर पीडितेच्या आईने मात्र पर्लला निर्दोष सांगितले आहे. सध्या तो 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहे.

पीडितेच्या वडिलांनी खुलासा करत पर्लची ओळख स्वतः त्यांच्या मुलीनेच सांगितल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी एक निवेदन जाहीर केले. ज्यात त्यांनी लिहिले की, 'माझी मुलगी गेले पाच महिने तिच्या आईसोबत होती. माझ्या मुलीसोबत माझा कोणताही संपर्क नव्हता. जेव्हा मी तिच्या शाळेत फी भरण्यासाठी गेलो तेव्हा ती येऊन मला बिलगली. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने माझ्यासोबत घरी येण्याचा हट्ट केला. मी तिला घरी घेऊन आल्यानंतर तिने घडलेली संपूर्ण घटना मला सांगितली. त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली. मुलीची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली त्यात हे स्पष्ट झाले होते की मुलगी खरे बोलत आहे. तिचं शोषण करण्यात आले आहे.'

या टीव्ही शोजमध्ये झळकला पर्ल पुरी

पर्लने नागिन 3 सोबतच 'दिल की नजर से खूबसूरत', 'फिर भी ना माने बदतमीज दिल', 'मेरी सासू मां', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' आणि 'ब्रह्मराक्षस 2' या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तो बिग बॉस 12 आणि 13 मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय किचन चॅम्पिअन 5 आणि खतरा-खतरा-खतरा या रिअॅलिटी शोजमध्येही पर्लने काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...