आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Police Found An Accused Of A Fatal Attack On TV Actress In An Injured Hall, Police Will Be Arrested After Recovering

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालवी मल्होत्रा​​वरील हल्ला प्रकरण:टीव्ही अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी पोलिसांना जखमी अवस्थेत सापडला, बरा झाल्यानंतर केली जाईल अटक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकतर्फी प्रेमातून योगेश महिपालने मालवी मल्होत्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती.

टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूने वार करणा-या आरोपी योगेश महिपाल सिंहपर्यंत पोहोचण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मात्र, पोलिसांना तो जखमी अवस्थेत सापला. त्याला पोलिसांच्या देखरेखीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो पूर्ण बरा झाल्यानंतर पोलिस त्याला अटक करतील.

एका पोलिस अधिका-याने सांगितले की, आरोपी योगेश महिपाल सिंह याला मंगळवारी रात्री पालघर जिल्ह्यातील वसई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालवी मल्होत्रावर हल्ला केल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. परंतु पोलिसांना अद्याप याविषयी काहीही अधिकृत सांगितलेले नाही.

  • मालवी मल्होत्राच्या हातावर आणि पोटावर केले वार

अभिनेत्री मालवी मल्होत्राच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री आरोपीने तिच्या पोटात आणि दोन्ही हातांवर वार केले. यात अभिनेत्री गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेमातून योगेशने हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे.

  • लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने नाराज झाला होता

आतापर्यंत पोलिस तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, योगेश नावाच्या व्यक्तीने प्रोडक्शनशी संबंधित कामाचे निमित्त करुन मालवीशी ओळख वाढवली. लग्नाचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवला. मालवीने मनोरंजनसृष्टीत करिअर करायचे आहे, लग्नाची घाई करू इच्छित नाही असे सांगत प्रस्ताव फेटाळला. तिचा नकार योगेशला सहन झाला नाही. सोमवारी रात्री मालवी घराच्या दिशेने चालत जात असताना योगेश ऑडी कार घेऊन तिच्या समोर आला. त्याने मालवीला अडवले. तिने पुन्हा एकदा योगेशला समजावण्याचा प्रयत्न केला. पण योगेशने काही ऐकून घेतले नाही. एकदम खिशातून चाकू काढला आणि मालवीच्या पोटात आणि हातावर चार वेळा वार केले. आसपास गर्दी होत असल्याचे लक्षात येताच तो कारमधून पळून गेला. स्थानिकांनी तातडीने जखमी मालवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

याप्रकरणी पोलिसांनी मालवीची साक्ष नोंदवली आहे. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तसेच योगेश फेसबुकवरुन सुरुवातीला ओळख वाढवत होता, असे सांगितले. योगेशने 2019 मध्ये फेसबुकद्वारे मालवीशी संपर्क साधला आणि लवकरच ओळख वाढवली. त्याचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मालवीने योगेशला फेसबुकवर ब्लॉक केले होते. पण योगेशने मालवीशी संपर्क साधण्याचा आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मालवीचा विरोध कायम असल्याचे पाहून योगेशने चाकूने हल्ला केला होता.

वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिंहविरोधात कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.