आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Pooja Banerjee's Three year old Niece's Entry In 'Kumkum Bhagya' Is The Real Story Behind Chimukalya Ridhana's Entry

न्यू एंट्री:पूजा बॅनर्जीच्या तीन वर्षीय भाचीची झाली ‘कुमकुम भाग्य’मध्ये एंट्री, ही आहे चिमुकल्या रिधान्याच्या एंट्रीमागची खरी स्टोरी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजाच्या भाचीचा फोटोंच्या रूपाने या मालिकेत प्रवेश झाला आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेच्या कथानकाला अनपेक्षितपणे नवी कलाटणी मिळत आहे. रणबीर (कृष्ण कौल) आणि प्राची (मुग्धा चापेकर) यांच्यातील प्रेमाचे गुपित उघड केल्यावर मालिकेत र्‍्हियाची भूमिका साकारणा-या नैना सिंहऐवजी आता एका नव्या कलाकाराचा चेहरा प्रेक्षकांपुढे आला आहे. ही भूमिका आता टीव्हीवरील अभिनेत्री पूजा बॅनर्जी ही रिह्याची भूमिका साकारत असून तिच्यामुळे रणबीर आणि प्राचीच्या जीवनात वादळ उठते. पण या मालिकेत नव्याने प्रवेश केलेली केवळ तीच एक कलाकार नाही. अलीकडेच पूजा बॅनर्जीच्या भाचीनेही ‘कुमकुम भाग्य’मध्ये प्रवेश केला होता. किंबहुना या भाचीचे पूजाच्या चेह-याशी असलेल्या साम्यामुळे मालिकेला वेगळीच शोभा आली होती.

‘कुमकुम भाग्य’मध्ये रिह्याच्या (पूजा बॅनर्जी) खोलीत तिच्या बालपणीची अनेक छायाचित्रे लावण्यात आल्याचे दाखविले होते. तिच्या व्यक्तिरेखेला अधोरेखित करण्यासाठी हा उपाय योजण्यात आला होता. त्यासाठी दिग्दर्शकांनी पूजाकडे तिचे लहानपणीचे फोटो मागितले होते. तेव्हा पूजाने त्यासाठी आपली तीन वर्षांची भाची, रिधान्याची छायाचित्रे वापरण्याची सूचना त्यांना केली. रिधान्या आणि पूजा यांच्या चेह-यात प्रचंड साम्य आढळून आल्यामुळे ही सूचना लगेच अंमलात आणण्यात आली. याबाबत पूजा बॅनर्जी म्हणाली, “माझी खोली सजविण्यासाठी क्रिएटिव्ह टीमने माझी लहानपणीची छायाचित्रं मागितली होती. पण मालिकेत वापरता येतील, अशी माझी लहानपणीची छायाचित्रं माझ्याकडे उपलब्ध नव्हती. मला अनेकांनी सांगितलं होतं की माझी भाची रिधान्या ही बरीचशी माझ्यासारखीच दिसते. त्यामुळे मी या टीमला तिचं नाव सुचविलं. या लहान मुलीला या वयातही अभिनयाची आवड असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. म्हणूनच मी तिचे फोटो वापरण्याची सूचना केली होती. या टीमने तिची छायाचित्रं पाहताक्षणी त्यांना मंजुरी दिली. त्यामुळे सध्या प्रेक्षकांना माझे लहानपणीचे फोटो म्हणून माझ्या भाचीचे फोटो पाहायला मिळत आहेत.”

पूजा सांगते, “रिधान्या केवळ तीन वर्षांची आहे आणि ती मला अतिशय आवडते. इतक्या लहान वयातही तिला नाट्यपूर्ण पोझ देणं, नाचणं याची आवड आहे. ती पक्की नाटकी आहे. आता ती माझ्या मालिकेत या फोटोंच्या रूपाने आल्यामुळे मला काही खास वाटतं. मोठेपणी जेव्हा रिधान्या ही मालिका पाहील आणि ती आपली छायाचित्रं पाहील, तेव्हा तिला नक्कीच आश्चर्य आणि आनंद वाटेल. स्वत:ला टीव्हीच्या पडद्यावर पाहताना तिची प्रतिक्रिया कशी असेल, ते पाहायची मला उत्सुकता लागली आहे.”