आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Popular TV Show Ek Hazaaron Mein Meri Behna Hai Actress Tarla Joshi Passes Away; Nia Sharma, Krystle D'Souza And Many Other Celebs Expressed Their Grief

निधन:'एक हजारों में मेरी बहना है'मधील 'बडी बीजी' तरला जोशी यांचे निधन, निया शर्मा, क्रिस्टल डिसुजासह अनेक सेलेब्सनी व्यक्त केला शोक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरला यांच्या निधनाचे नेमके कारण समोर आलेले नाही.

‘एक हजार में मेरी बेहना है’ या गाजलेल्या मालिकेत बडी बीजी ही व्यक्तिरेखा साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन झाले आहे. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या मालिकेत तरला यांच्यासह काम केलेल्या निया शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी दिली. तरला जोशी यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे.

तरला जी तुम्ही कायम आमच्या 'बडी बीजी' असाल
निया शर्माने तरला जोशी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिले, 'RIP बजी बीजी.. तुमची कायम आठवण येईल. तरला जी तुम्ही कायम आमच्या बडी बीजी राहाल.' ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते. या मालिकेत निया शर्माने मानवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तरला जोशी यांनी ‘बंदिनी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आणि ‘एक हजार में मेरी बेहना है’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बंदिनी’ या मालिकेतून तरला यांना खरी ओळख मिळाली होती. तरला यांच्या निधनाचे नेमके कारण समोर आलेले नाही.

क्रिस्टल डिसुजाने वाहिली श्रद्धांजली
‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत निया शर्माची मोठी बहीण जीविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिस्टर डिसुजा हिने तरला जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. क्रिस्टलने शूटिंगच्या काळातील तरला जोशी यांच्यासोबतची छायाचित्रे शेअर करत लिहिले, 'तुमची कायम आठवण येईल बडी बीजी.' तरला जोशी यांना छोट्या पडद्यावरील 'बा' म्हटले जायचे. त्यांनी अनेक मालिकांमध्ये 'बा'ची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...