आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Powerful Post Of Nisha Rawal, Fighting A Legal Battle With Karan Mehra, Said 'I Have Come Out After Breaking The Chain That Held Me'

सोशल मीडिया पोस्ट:करण मेहरासोबत कायदेशीर लढाई लढणाऱ्या निशा रावलची पॉवरफुल पोस्ट, म्हणाली- 'मी त्या साखळ्या तोडून बाहेर पडले आहे, ज्यांनी मला जखडून ठेवले होते'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निशाने स्वतःचे एक ग्लॅमरस छायाचित्र शेअर करत दमदार पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री निशा रावल सध्या पती करण मेहरासोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच निशाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहराविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. यानंतर, निशाने एका पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला की, करणने अनेकदा तिच्यावर हात उचलला होता. यावेळी तिच्या चेह-यावर मारहाणीच्या खुणादेखील स्पष्ट दिसत होत्या. आता बऱ्याच काळानंतर निशाने एक दमदार पोस्ट शेअर केली आहे.

निशाने स्वतःचे एक ग्लॅमरस छायाचित्र शेअर करत लिहिले, 'मी त्या दरवाज्यातून बाहेर पडले आहे, जिथे माझी त्वचा आणि हाडांना साखळ्यांनी जखडले होते. मी माझ्या जुन्या स्वत:ला मागे सोडले नाही, तर फक्त ते माझ्या नव्याने सापडलेल्या खांद्यावर ठेवले आहे, ज्या शक्तीची जाणीव मला आजवर नव्हती. माझे शरीर, आत्मा आणि मनाचे आभार मान्याचा हा क्षण आहे…कारण त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. आता मी स्वत:ची खरी मैत्रीण आहे. आता फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे. निशा रावल डायरी,' अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

बॉलिवूड टाइम्ससोबतच्या बातचीतमध्ये निशाने आपली बाजू मांडताना सांगितले की, 'मी करणविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मी गेली कित्येक वर्षे याबद्दल बोलले नाही, कारण मला माहित आहे की अभिनेत्यासाठी त्याचे करिअर आणि प्रतिमा किती महत्वाची आहे.'

करण मेहराप्रमाणेच निशा रावलसुद्धा लवकरच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 15 मध्ये दिसू शकते. सध्या तिची टीम निर्मात्यांशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे.

बातम्या आणखी आहेत...