आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करणी सेना VS प्रकाश झा:'आश्रम 2'च्या वादावर प्रकाश झा करणी सेनेवर निशाणा साधत म्हणाले -  सीरिज कशी आहे? हे प्रेक्षक ठरवतील; करणी सेनेकडून प्रकाश झांना कायदेशीर नोटीस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही वेब सीरिज येणाऱ्या तरुण पिढीमध्ये हिंदू धर्माबद्दल नकारात्मकता पसरवणारी ठरणार आहे, असा आरोप करणी सेनेने केला आहे.

‘आश्रम’ या वेब सीरीज दुसरा भाग 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, प्रकाश झा यांची ही वेब सीरीज प्रदर्शनापूर्वीच वादात अडकली आहे. अभिनेता बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरिजमधून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तर स्पॉटबॉयसोबत झालेल्या संभाषणादरम्यान प्रकाश झांनी करणी सेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, "त्यांच्या मागणीवर निर्णय घेणारा मी कोण आहे? पहिल्या सीजनला आम्हाला 40 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. मला वाटते की, या सीरिजमधून नकारात्मकता पसरतेय की सकारात्मकता हे प्रेक्षक ठरवतील."

महाराष्ट्र करणी सेनेने पाठवली कायदेशीर नोटीस
करणी सेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांनी प्रकाश झांना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रकाश झा व्यतिरिक्त, जिथे ही वेब सीरिज प्रदर्शित करण्यात आली त्या ‘एमएक्स प्लेयर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे. ‘या वेब सीरिजमधून धार्मिक परंपरा, आश्रम धर्म, प्राचीन सांस्कृतिक परंपरा यांना लक्ष्य करण्यात आले आहे’, असे करणी सेनेने आपल्या या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे.

वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी
या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असला, तरी आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनावर मात्र संकट कोसळले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

करणी सेनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांच्या वकिलाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ नावाच्या वेब सीरिजमुळे लोकांच्या भावनांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही वेब सीरिज येणाऱ्या तरुण पिढीमध्ये हिंदू धर्माबद्दल नकारात्मकता पसरवणारी ठरणार आहे.’

तसेच वेब सीरीजच्या अधिकृत ट्रेलरमध्ये दर्शवलेले वैशिष्ट्य कोणत्याही व्यक्तिमत्वाला लक्ष्य करत नाही. तर, या ट्रेलरमधून पुरातन परंपरा, प्रथा, हिंदू संस्कृती, आश्रम धर्म यांना लक्ष्य केले जात आहे. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असेही या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे.

या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसह अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.