आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'मन की आवाज: प्रतिज्ञा', 'कितनी मोहब्बत है', आणि 'एक नई उम्मीद : रोशनी' यासारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री पूजा गौर 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर प्रियकर राज सिंह अरोरापासून विभक्त झाली आहे. पूजाने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. हा निर्णय घेणे खूप कठीण होते आणि याविषयी काहीही बोलण्यापूर्वी थोडा वेळ हवा होता, असे पूजाने म्हटले आहे.
पूजाने लिहिले - आम्ही कायम चांगले मित्र राहू
पूजाने पोस्टमध्ये लिहिले आहे - 2020 या वर्षात बरेच बदल घडून आले आहे. चांगले तसेच वाईट. गेल्या काही महिन्यांत राजसोबतच्या माझ्या नात्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कठीण निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. याबद्दल बोलण्यापूर्वी मला थोडा वेळ हवा होता.
राज आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे मार्ग आता वेगळे झाले असले, तरीही प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर हा आयुष्यभर राहील. मी त्याच्याबद्दल कायमच चांगला विचार करेन. कारण माझ्या आयुष्यात त्याचा महत्त्वाचा प्रभाव राहिला आहे. मी नेहमीच त्याची आभारी राहीन. आम्ही नेहमीच मित्र राहू आणि हे मैत्रीचे नाते कधीही बदलणार नाही.
याबद्दल बोलण्यास खूप वेळ आणि धैर्य लागतं. सध्या, मला एवढेच सांगायचे आहे. याक्षणी, आमची प्रायव्हसी समजून घेतल्याबद्दल आणि त्याचा आदर केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.
'कोई आने को है'च्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते
वृत्तानुसार पूजा आणि राज यांची पहिली भेट 'कोई आने को है' (2009) या मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. सुरुवातीला पूजाच्या कुटूंबियांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. मात्र नंतर सर्वांनी मान्य केले. ब्रेकअपनंतर पूजाने सोशल मीडियावरुन राजसोबतचे बहुतेक फोटो काढून टाकले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.